Top News कोरोना मनोरंजन

माझ्यासाठी दुसरा कुठला जाॅब असेल तर बघा; का म्हणत आहे अमिताभ बच्चन असं?

मुंबई | देशभरात असलेल्या कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे आर्थिक संकटंही उद्भवलं आहे. अनेकांना या परिस्थितीत काम करणंही कठीण झालंय. कोरोनापासून प्रत्येकजण स्वत:ची काळजी घेतोय. सर्वांच्याच मनात कोरोनाची धास्ती दिसून येतेय. याला महानायक अमिताभ बच्चन हे पण अपवाद ठरले नाहीयेत. कोरोनाच्या भितीमुळे, माझ्यासाठी दुसरा कुठला जॉब मिळेल का? अशी विचारणा त्यांनी चाहत्यांना केलीये.

अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली होती. नुकतच त्यांनी कोरोनावर मात केली. 23 दिवसानंतर त्यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. पण त्यांच्या मनातील कोरोनाची भीती अजूनही गेली नाहीये.

अमिताभ बच्चन यांनी एक ब्लॉग लिहिला आहे. यामध्ये ते म्हणतात, ‘अनेक प्रकारच्या समस्या आणि चिंता आहेत, यामध्ये काहीही दुमत नाही. कोरोना काळात 65 वर्षांवरील व्यक्ती कामासाठी बाहेर जाऊ शकत नाही. माझ्या सारख्यांसाठी हे पॅक-अप सारखं आहे. आता कोर्टाने 65 वर्षांवरील कलाकारांना शूटिंगसाठी परवानगी दिलीये खरी पण ते स्वातंत्र्य अनुभवता येत नाही. मनात कायम भीती घर करून राहतं. माझ्यासाठी दुसरा कुठला जॉब असेल तर मला सांगा.”

अमिताभ यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील चौघांना कोरोनाची लागण झाली होती. अभिषेक, ऐश्वर्या बच्चन आणि आराध्या बच्चन शिवाय अभिषेक या सर्वांची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आलेली. यानंतर चौघांनाही रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारानंतर सर्वांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय.

महत्त्वाच्या बातम्या-

…म्हणून भाजपचे आमदार शरद पवार यांना भेटतात, चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं खरं कारण

“राणे भविष्य सांगणाऱ्या पक्षात, त्यामुळे पोपटासारखं तर बोलणारचं ना…”

सप्टेंबरपर्यंतच ठाकरे सरकार राहिल, भाजपच्या बड्या नेत्याचं वक्तव्य

रामदेव बाबांची आता आयपीएलमध्ये उडी, उचलणार मोठं पाऊल?

मंत्री विश्वजीत कदम यांच्या घरात कोरोनाचा शिरकाव

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या