पैज लावून सांगतो, असा कॅच तुम्ही पाहिलाच नसेल!

मेलबर्न | क्रिकेटमध्ये रोज नवनवे विक्रम नोंदवले जात असतात, मात्र बिग बॅश लिगमध्ये एक असा कॅच पकडण्यात आलाय जो तुम्ही यापूर्वी कधीच पाहिला नसेल.

अॅडलेड स्ट्राईकर्स आणि मेलबर्न रेनगडेस संघांच्या सामन्यादरम्यान हा प्रकार घडला. मेलबर्नकडून खेळणाऱ्या विंडीजच्या ड्वेन ब्रॅव्होने राशीद खानच्या गोलंदाजीवर तुफानी फटका मारला. सीमारेषेवर असलेल्या बेन लौघालींने जोरात पळत जाऊन कॅच पकडला, मात्र त्याचे नियंत्रण सुटल्याने त्याने सीमारेषेपार जाण्यापूर्वी चेंडू जोरात मैदानात फेकला.

दरम्यान, बेन लौघालीपासून खूप अंतरावर उभ्या जॅक वेटहेराल्डपर्यंत हा चेंडू पोहोचला. त्यानेही तितक्याच चपळाईने तो पकडला. निवेदकांनी हा आतापर्यंत पाहिलेला सर्वोत्तम कॅच असल्याचं म्हटलंय.

पाहा व्हिडिओ-