बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यात बिग बास्केट कंपनीला भीषण आग; सर्व साहित्य जळून खाक

मुंबई | पुण्यातील कोथरुड परिसरातील बिग बास्केट कंपनीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. या आगीत कंपनीचं मोठं नुकसान झालं आहे.

पुणे महापालिका अग्निशमन दल, पिंपरी चिंचवड, पीएमआरडीए आणि एमआयडीसी येथील एकूण 12 फायर इंजिन्सच्या मदतीने आग विझवण्यात आली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामनदलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आग नियंत्रणात आणली आहे.

रात्रीच्या वेळी आग लागल्याने या ठिकाणी फार लोक नसल्याने सुदैवाने कोणीही जखमी झालेले नाही. मात्र या आगीमध्ये लाखो रुपयांचा माल आणि गोडाऊन जळून खाक झालं आहे.

सोमवारी रात्री साडेअकरा वाजता बावधान बुद्रुक येथील बिग बास्केटच्या गोडाऊनला आग लागली. याआगीमध्ये धान्य, भाजीपाला, किराणा सामान जळून खाक झालं आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामनदलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आग नियंत्रणात आणली आहे.

थोडक्यात बातम्या- 

राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

“मुंबई हे महिलांसाठी जगातील अत्यंत सुरक्षित शहर आहे”

“उद्धव ठाकरेंना शिवसेनेच्या इज्जतीचा लिलाव करण्याची हौस आहे”

“श्रेय स्वत:ला घ्यायचं आणि दोष दुसऱ्याला द्यायचा हाच मोदींचा मंत्र”

‘कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊनही…’; महत्त्वाची माहिती समोर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More