बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाचे नियम धाब्यावर; पुण्यात सराईत गुन्हेगाराच्या अंत्यविधीला मोठी बाईक रॅली

पुणे | लॉकडाऊन सुरू असताना पुण्यात एका सराईत गुन्हेगाराच्या अंत्यविधीला 125 बाईकची रॅली काढण्यात आल्याचं पाहायला मिळालं. याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या प्रकरणी तब्बल 200 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील माधव वाघाटे या सराईत गुन्हेगाराची शनिवारी पहाटे हत्या झाली. व्हॉट्सअॅप स्टेटसवरुन झाल्याने वादानंतर टोळक्यानं बिबवेवाडी इथं सरोजिनी क्लिनिकसमोर माधव वाघाटे याच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

धनकवडी ते कात्रज स्मशानभूमीपर्यंत ही रॅली काढण्यात आली. या प्रकरणी 150 ते 200 जणांविरोधात सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या अंतयात्रेचा एक व्हिडीओ समोर आला असून मोठ्या संख्येने या तडीपार गुंडाचे समर्थक अंत्ययात्रेत जमा झाले होते. पुण्यात सध्या चौकाचौकात नागरिक विनाकारण बाहेर पडत असल्यास त्यांच्यावर कारवाई आहे. तर दुसरीकडे एका सराईत गुन्हेगाराच्या अंत्यविधीला अशाप्रकारची रॅली निघाल्यामुळे पुणे पोलिसांच्या कामगिरीबाबत प्रश्न विचारले जात आहेत.

माधव वाघाटे, सुनिल खाटपे, सारंग गवळे हे एकमेकांच्या ओळखीचे होते. शुक्रवारी रात्री सारंग गवळी आणि सुनिल खाटपे यांच्यात व्हॉट्सअॅप स्टेटसवरुन वाद झाला होता. यानंतर माधव वाघाडे खाटपेला भेटण्यासाठी बिबवेवाडी परिसरात आला. त्यावेळी गवळीचे 8 ते 10 साथीदार तिथे आले. त्यांनी वाघाटेवर बांबू, दगड, लोखंडी रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात वाघाटेचा मृत्यू झाला

थोडक्यात बातम्या- 

दिलासादायक बातमी! पुण्यात आज नव्या रूग्णांपेक्षा डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त!

मन सुन्न करणारी घटना; बापाने मुलीचा मृतदेह खांद्यावर घेऊन पायी चालत स्मशानात नेला, पाहा व्हिडीओ

गोपीनाथ मुंडे साहेबांचा लाडका युवा नेता हरपला- पंकजा मुंडे

हृदयद्रावक घटना! 25 दिवसांपूर्वी आई झालेल्या डॉक्टरचा कोरोनानं मृत्यू

“महाविकास आघाडी सरकारने सत्तेत येताच मराठा आरक्षणाचा खून केला”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More