मुंबई | जगभरात अनेक वापरकर्ते आहेत जे Netflix सदस्यत्व घेतात आणि त्याच्या मित्र आणि कुटुंबातील सदस्यासह पासवर्ड शेअर करतात, जेणेकरून प्रत्येकजण Netflix चा आनंद घेतात. परंतू कंपनीला याचा खूप त्रास सहन करावा लागत आहे. हे लक्षात घेऊन नेटफ्लिक्स आता पासवर्ड शेअरिंग बंद करण्याचा विचार करत आहे.
पासवर्ड शेअरिंग रोखण्यासाठी कंपनी चाचणी करत आहे. त्यानंतर आता यूजर्सना पासवर्ड शेअर करण्यासाठी कंपनीला पैसेही द्यावे लागणार आहेत. आणखी एक दिलासा म्हणजे एका घरात राहणाऱ्या वापरर्केत्यांनाना पासवर्ड शेअर करण्याचा पर्याय दिला जाईल. त्याच वेळी वापरकर्त्यांना घराबाहेर इतर ठिकाणी प्राथमिक खात्याच्या लॉगिन तपशीलवरून नेटफ्लिक्स चालवण्यासाठी पैसे द्यावे लागतील.
कंपनीचे प्रोडक्ट इनोव्हेशन डायरेक्टर चेंगहाई लॉग एक ब्लाॅग पोस्टमध्ये म्हणाले, आम्हाला समजलं आहे की वापरर्केत्यांकडे मनोरंजनासाठी अनेक पर्याय आहेत. म्हणूनच नेटफ्लिक्समध्ये येणारे कोणतेही नवीन फीचर युजर्ससाठी सोयीचे आणि उपयुक्त असावे असा आमचा प्रयत्न आहे.
दरम्यान, पासवर्ड शेअरिंगला ब्रेक लावणाऱ्या वैशिष्ट्याची चिली, कोस्टा रिका आणि पेरूमध्ये चाचणी केली जात आहे. येत्या आठवड्यात, या देशांच्या वापरर्केत्यांना सब-अकाउंटमध्ये दोन अतिरिक्त वापरकर्ते जोडण्यााचा पर्याय दिला जाऊ शकतो.
थोडक्यात बातम्या-
मोठी बातमी! अभिनेत्री कंगना रनौतला न्यायालयाचा दणका
38 हजारात खरेदी करा Honda Activa, जाणून घ्या ऑफर
“पावसात भिजून देखील राष्ट्रवादीचे 54 आमदारच निवडून आले”
‘सर्व प्रियजनांना आणि नॉटी जनांना…’; अमृता फडणवीसांचा संजय राऊतांना टोला
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची शक्यता; राज्यात ‘या’ भागात उकाडा वाढणार!
Comments are closed.