बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सत्तांतर झाल्यानंतर आदित्य ठाकरेंना महापालिकेत दुसरा धक्का!

मुंबई । राज्यात सत्तांतर झाल्यापासून मुंबई महापालिकेतील शिवसेना निकटवर्तीयांचे बदली सत्र सुरूच आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेले मुंबई महापालिकेचे जी विभागाचे सहाय्यक आयुक्त शरद उघाडे यांचीही बदली झाल्याची माहिती येतेय.

शरद उघाडे यांची डी विभागाच्या आयुक्त पदी बदली करण्यात आली आहे. उघाडे हे आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय आहेत. आदित्य ठाकरेंनी उघाडे यांच्या मार्फत वरळी आणि दादर-माहीम विधानसभा मतदारसंघात अनेक विकास कामं केली आहेत. आता मात्र राज्यात सत्तासंघर्ष सुरू असताना शरद उघाडे यांची बदली केली गेली आहे.

आदित्य ठाकरेंसोबतच शिवसेनेलाही धक्का बसला आहे. येत्या काळात आणखी कोणत्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होतात हे पाहणं महत्वाचं ठरेल.

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More