Airtel च्या ग्राहकांना मोठा झटका!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | सध्या एअरटेलचे(Airtel) रिचार्ज(Mobile Recharge) प्लॅन महागणार आहेत, अशा चर्चा सुरू आहेत. या चर्चा तेव्हापासून सुरू झाल्या आहेत, जेव्हा एअरटेल कंपनीच्या चेअरमननं मोठं वक्तव्य केलं.

एअरटेल कंपनीचे चेरअमन सुनिल भारती मित्तल म्हटले आहेत की, भारतीय टेलिकाॅम इंडस्ट्रीत अवरेज रेवेन्यूपर यूजर खूप कमी आहेत, हे ३०० रूपये प्रति महिना पाहिजे. मित्तल यांच्या या वक्तव्यानंतर एअरटेलचे रिचार्ज प्लॅन महागतील असा अंदाज लावला जात आहे.

जेव्हा सगळीकडे 5G सेवा उपलब्ध होईल तेव्हा एअरटेल कंपनी आपल्या रिचार्ज प्लॅनचे दर वाढवू शकते. म्हणजेच कंपनी एक चांगली संधी पाहून रिचार्ज प्लॅन वाढवण्याच्या विचारात आहे.

एअरटेलचे रिचार्ज प्लॅन गेल्या वर्षाच्या शेवटीही महागले होते. आणि आता पुन्हा एकदा कंपनी रिचार्ज प्लॅनच्या दरात वाढ करू शकते.

दरम्यान, केवळ एअरटेलच नाही तर जिओ, आयडिया(Idea) या कंपन्याही आयात मालावरील जकात कमी सांगत आहेत. त्यामुळं आता सर्वच टेलिकाॅम कंपन्या रिचार्ज वाढवू शकतात.

महत्वाच्या बातम्या-