अजित पवारांना मोठा धक्का?, ‘हा’ आमदार परतीच्या वाटेवर?

Ajit Pawar | नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीतील दोन पक्षच आमने-सामने आले आहेत. महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे संदीप गुळवे हे मैदानात आहे. मात्र विधान परिषद निवडणुकीत वेगळं चित्र पाहायला मिळालं. अजित पवारांच्या आमदारानेच उद्धव ठाकरेंच्या उमदेवाराला पाठिंबा जाहीर दिला. यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

विधान परिषद निवडणुकीत अजित पवारांच्या आमदारानेच उद्धव ठाकरेंच्या उमदेवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नरहरी झिरवळ यांनी शिवसेनेचे उमेदवार संदीप गुळवे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.

अजित पवारांना मोठा धक्का?

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नरहरी झिरवळ यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधत संदीप गुळवे यांनी भेट घेतली होती. त्यानंतर झिरवळ यांनी त्यांना पाठिंबा जाहीर केला. सर्व कार्यकर्त्यांनी संदीप गुळवे यांचं काम करावं, अशा सूचनाही झिरवळ यांनी दिल्या आहेत. कौटुंबिक संबंधांमुळे गुळवे यांना पाठिंबा जाहीर केल्याचं झिरवळ यांनी म्हटलं आहे.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने किशोर दराडे यांना उमेदवारी दिलेली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही महेंद्र भावसार यांना रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देणं अपेक्षित असताना झिरवळ यांनी गुळवे यांना पाठिंबा जाहीर केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. यामुळे झिरवळ परतीच्या वाटेवर आहेत का?, अशा चर्चा सुरू झाल्यात.

Ajit Pawar | विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागा रिक्त होत असून, त्यासाठी निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. विधान परिषदेच्या 11 जागांच्या निवडणुकीत विधानसभेचे आमदार मतदान करतात.

सध्यस्थितीत महायुतीकडे आमदारांची संख्या मोठी आहे. दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार कमी आहेत, त्यामुळे जागा राखता येणार का? त्यामुळे या निवडणुकीत कुरघोड्या होण्याची चिन्हे आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

“मनोज जरांगे आणि भुजबळ यांनी एकत्र यावं”

मोठी बातमी! आणखी एका भयंकर अपघाताने पुणे हादरलं

‘आधी बळीचा बकरा बनवलं, आता…’; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य

ऐश्वर्या आणि जया बच्चन यांचं बिनसलं?; ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

‘तुमच्या बुडाखाली…’; किरण मानेंनी देवेंद्र फडणवीसांना सुनावलं