बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अनिल अंबानींना मोठा झटका; अडचणी वाढण्याची शक्यता

मुंबई | कर्नाटक बँकेकडून रिलायन्स होम आणि रिलायन्स कमर्शियल फायनान्स या कंपन्यांनी घेतलेले 160 कोटींचे कर्ज फ्रॉड असल्याचे जाहीर केलंय. यामुळे उद्योगपती अनिल अंबानी यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.

आम्ही 2014 पासून रिलायन्स समूहातील या दोन कंपन्यांसोबत काम करत आहोत. रिलायन्स फायनान्सच्या मल्टिपल बँकिग व्यवस्थेत आमचा 0.39 टक्के तर रिलायन्स कमर्शियल फायनान्समध्ये 1.98 टक्के इतका हिस्सा आहे. दोन्ही कर्जांसाठी 100 टक्के तरतूद करण्यात आली आहे. तसेच दोन्ही कर्जाची खाती बुडीत खाती म्हणून नोंदवण्यात आली होती. त्यामुळे बँकेच्या आर्थिक स्थितीवर कोणताही परिणाम होणार नाही, असं कर्नाटक बँकेकडून सांगण्यात आलं.

उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स होम फायनान्स कंपनीला खरेदीदार मिळाल्याची माहिती समोर येत आहे. एथॅम इन्व्हेस्टमेंट अँण्ड इन्फ्रास्ट्रक्टर लिमिटेडने रिलायन्स होम फायनान्स कंपनी खरेदी करण्यासाठी 2,887 कोटी रुपये मोजण्याची तयारी दर्शविली आहे.

रिलायन्स समूहावर बँकांचे हजारो कोटींचे कर्ज आहे. त्यामुळे हा व्यवहार पार पडल्यास बँक ऑफ बडोदाबडोदाबडोदाच्या नेतृत्वाखालील बँकांच्या समूहाला 2,887 कोटी रुपये मिळतील.

थोडक्यात बातम्या- 

…म्हणून कोरोना मृतांच्या कुटुंबियांना आम्ही 4 लाख देऊ शकत नाही- केंद्र सरकार

“उद्धव ठाकरेंचं वर्धापन दिनाचं भाषण हे एका सरकार प्रमुखाचं नसून एका गॅंग प्रमुखाचं होतं”

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत जनजागृती करणं आवश्यक – अजित पवार

“उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं नाही, मग महाशिव आघाडीची महाविकास आघाडी कशी झाली?”

खुशखबर! आज चांदी 2 हजारांनी तर सोनं 600 रुपयांनी उतरलं; वाचा ताजे दर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More