विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का!

BJP | विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला (BJP) मोठा धक्का बसला आहे. भाजपचे अनेक पदाधिकारी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. गेल्या काही वर्षांत काँग्रेससोडून भाजप व इतर पक्षात गेलेले काँग्रेसचे पदाधिकारी पुन्हा घरवापसी करत आहेत. दोन दिवसांपूर्वी मनसे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्या पाठोपाठ आता भाजपचे पदाधिकारी काँग्रेसमध्ये येणार आहेत.

भाजपला मोठा धक्का

भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष राकेश मुथा यांनी भाजपवर आरोप केले आहेत. भाजपमध्ये सर्वांना समान संधी मिळत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून काही ठराविक जणांनाच संधी दिली जाते. त्यांच्याकडून भेदभाव केला जातो. वरिष्ठ पदाधिकाऱ्यांमुळे पक्षात काम करण्यास संधी मिळत नाही, असे आरोप मुथा यांनी केले आहे.

काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी राकेश मुथा एकटेच नाही तर भाजपसह इतर पक्षातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलं.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश सोहळा होणार आहे. भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष राकेश मुथा यांच्यासह शेकडो पदाधिकारी काँग्रेसचा हात पकडणार आहे.

काँग्रेस पक्षाला नवी संजीवनी

कल्याण डोंबिवलीत युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते. मात्र 2016 मध्ये त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता 9 ऑगस्ट रोजी नाना पटोले यांच्या उपस्थितीत त्यांचा काँग्रेस प्रवेश होणार आहे.

काँग्रेसमध्ये इनकमिंग सुरू झाल्याने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली परिसरात काँग्रेस पक्षाला नवी संजीवनी मिळत असल्याची चर्चा रंगली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

उद्धव ठाकरेच मविआचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा?, थेट दिल्लीतून मोठी बातमी

विधानसभेला महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला?, अजित पवार म्हणाले..

मोठी बातमी! ”या’ योजनेअंतर्गत 50 हजार युवकांना मिळणार ‘इतके’ रुपये

समंथाचा एक्स नवरा पुन्हा पडला प्रेमात; ‘या’ अभिनेत्रीशी थाटणार दुसरा संसार

RBI चे नवीन पतधोरण जाहीर; तुमचा कर्जाचा EMI वाढणार की घटणार?