जळगाव | जळगावात भाजपला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. भारतीय जनता पक्षाच्या जळगाव ग्रामीण जिल्हा उपाध्यक्षा अस्मिता पाटील यांनीही भाजपला सोडचिठ्ठी दिली.
अस्मिता पाटील या जळगाव भाजपच्या ग्रामीण जिल्हा उपाध्यक्षा आणि बेटी बचाव बेटी पढाव अभियानाच्या राज्य सदस्या होत्या. त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत आपल्या पदाचा राजनामा दिल्याची माहिती आहे.
एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम केल्यावर भाजपची खानदेशातील गळती वाढली आहे. तसेच आता अस्मिता पाटील हाती घड्याळ बांधणार की शिवबंधन, याची उत्सुकता आहे.
राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी अन्य पक्षात गेलेल्या नेत्यांना घरवापसीची साद घातली होती, तिला प्रतिसाद देत अस्मिता पाटील राष्ट्रवादीत स्वगृही परतणार का हा सवाल उपस्थित केला जात आहे.
थोडक्यात बातम्या-
आमदारकी नाही मिळाली तरी काम करत राहणार- ऊर्मिला मातोंडकर
ब्रिटनहून परतलेली बेपत्ता कोरोनाबाधित महिला आंध्रात सापडली!
नाईट कर्फ्यूवरून टीका करणाऱ्या विरोधकांना उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले…
“शेतकऱ्यांना खुनी-दंगलखोर ठरवणं, लोकशाहीच्या कुठल्या व्याख्येत बसतं?”
राजधानी दिल्लीला आज पहाटे पहाटे भूकंपाचे हादरे; नागरिकांमध्ये खळबळ