देश

शेतकरी आंदोलनामुळे भाजपला मोठा झटका, ‘या’ राज्यातील सत्ता जाणार?

चंदीगड | शेतकऱ्यांच्या रोषामुळे हरियाणातील भाजप सरकार अडचणीत आलं आहे. काँग्रेस पक्षाने हरियाणातील खट्टर सरकारविरोधात विधिमंडळात अविश्वास ठराव मांडणार असल्याची घोषणा केली आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी हरियाणातील काँग्रेस नेत्यांनी बैठक आयोजित केली होती. यावेळी काँग्रेस विधीमंडळ पक्षाने विशेष अधिवेशन बोलावून सरकारविरोधात अविश्वासदर्शक ठराव मांडण्याचा निर्णय घेतला.

शेतकऱ्यांबाबत मोठी चूक केल्यामुळे हरियाणा सरकार सध्या वाईट अवस्थेत आहे. शेतकऱ्यांना वॉटर कॅननद्वारे पाण्याचा मारा करणं शेतकऱ्यांवर किंवा अश्रुधुराची नळकांडी फोडणं हरियाणा सरकारला थांबवता आलं नसतं का? हरियाणा सरकारची ही कृती निषेधार्ह आहे, असं हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भुपिंदरसिंह हुड्डा यांनी म्हटलंय.

दरम्यान, काँग्रेसच्या अविश्वासदर्शक ठराव मांडण्याच्या घोषणेनंतर खट्टर सरकार काय भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

“जेवढा त्रास पवारसाहेबांना द्याल, दुप्पट जनता तुम्हाला देईल”

राज ठाकरेंनाही डिसले गुरुजींचा अभिमान, अशा शब्दात केलं कौतुक!

भारताला मोठा धक्का; हा स्टार खेळाडू झाला दुखापतग्रस्त!

अखेर मोदी सरकार नमलं; शेतकऱ्यांना दिली ‘ही’ परवानगी!

निलेश राणेंचं आक्षेपार्ह ट्विट; महाविकास आघाडीतील पक्षांना दिली ‘ही’ शिवी!

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या