बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जळगाव महापालिकेत खळबळ; नगरसेवकांनी घेतलेल्या निर्णयामुळे भाजपला मोठा धक्का

जळगाव | जळगाव महापालिकेवर गेल्या अडीच वर्ष भाजपची एक हाती सत्ता होती. भाजप नेते गिरीश महाजनांचा हा बालेकिल्ला समजला जातो होता. काही दिवसांपुर्वी याच जळगावामध्ये भाजपला मोठा धक्का बसला होता. भाजपचे 29 नगरसेवक फुटल्यानं शिवसेनेने जळगाव महापालिकेवर भगवा फडकवला होता. त्यातच आता भाजपला आणखी मोठा धक्का बसला आहे.

भारतीय जनता पक्षातील फुटलेल्या 29 नगरसेवकांनी बैठक घेऊन भाजपचे गटनेते, उपगटनेते यांची हकालपट्टी केली आहे. तर या नगरसेवकांनी आणखी मोठं पाऊल उचलत नवीन पदाधिकारी देखील नियुक्त केले आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे जळगाव महापालिकेत एकच खळबळ उडाली आहे. त्याच्या या नियुक्तीमुळे आता घटनात्मक नवा पेच उभे राहण्याची शक्यता आहे.

फुटीर भाजप नगरसेवकांनी मंगळवारी स्वतंत्र बैठक घेतली. त्यात त्यांनी नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्त केलं आहे. याबाबत या गटाचे सभागृह नेते ललित कोल्हे यांनी महापौरांना लेखी पत्र देऊन नवीन पदाधिकारी नियुक्तीला मंजुरी देण्याची मागणी केली आहे. फुटीर भाजप नगरसेवकांच्या या कृत्यामुळे गेल्या काही महिन्यात भाजपला एकामागून एक धक्के बसत आहेत.

दरम्यान, महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या जयश्री महाजन यांनी 45 मतं मिळवत महापौरपदी विराजमान झाल्या होत्या. तर भाजपच्या प्रतिभा कापसे यांना या निवडणुकीत 30 मतं मिळाली होती. भाजप नगरसेवकांनी शिवसेनेच्या खात्यात मतदान करून भाजपला घरचा आहेर दिला होता. त्यामुळे या महापालिका निवडणुकीत सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती झालेली दिसून आली.

थोडक्यात बातम्या-

‘फडतूस माणसांबद्दल मी बोलत नाही’; भास्कर जाधवांचं नितेश राणेंना प्रत्युत्तर

विधिमंडळातील हे 12 सदस्य उत्कृष्ट संसदपटू, भाषण पुरस्कारांनी सन्मानित!

ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांचं निधन; 98 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

‘या’ वयोगटातील लोकांना डेल्टा व्हेरियंटचा सर्वाधिक धोका; महत्वाची माहिती आली समोर

हिवाळी अधिवेशनाची तारिख ठरली; ‘या’ तारखेपासून नागपूरात होणार अधिवेशन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More