बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जळगावात भाजपला मोठा धक्का; महापालिकेवर शिवसेनेनं फडकवला भगवा

जळगाव | जळगाव महापालिकेवर गेल्या अडीच वर्ष भाजपची एक हाती सत्ता होती. भाजप नेते गिरीश महाजनांचा हा बालेकिल्ला समजला जातो होता. याच जळगाव मध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. जळगावच्या या महापालिका निवडणुकीत सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती झालेली दिसत आहे. भाजपच्या एक दोन नव्हे तर 27 नगरसेवक फुटल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. तर शिवसेनेने जळगाव महापालिकेवर भगवा फडकवला आहे.

महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या जयश्री महाजन यांनी 45 मतं मिळवत महापौरपदी विराजमान झाल्या आहेत. तर भाजपच्या प्रतिभा कापसे यांना या निवडणुकीत 30 मतं मिळाली. आज सकाळी महापालिकेच्या सभागृहात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन मतदान घेण्यात आलं. यात भाजप नगरसेवकांनी शिवसेनेच्या खात्यात मतदान करून भाजपला घरचा आहेर दिला आहे.

या निवडणुकीच्या आधीच मोठ्या प्रमाणावर वाद झाले होते. अॅड सुचिता हाडा यांनी शिवसेनेच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला होता. पण जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी हे आक्षेप फेटाळून लावले. यावेळी सभागृहात वाद झाल्याचं समजलं आहे.

दरम्यान, शिवसेनेच्या महापौर आणि उपमहापौर यांच्या उमेदवारीवर भाजपने आक्षेप घेतला आहे. तर भाजपने या प्रकरणात कोर्टात जाण्याची घोषणा केली आहे. तर इतक्या मोठ्या संख्येने नगरसेवक फुटल्याने गिरीश महाजनांना मोठा धक्का बसल्याचं समजलं जातं.

थोडक्यात बातम्या-

राज्यातील भाजपच्या या बड्या नेत्याला झाली कोरोनाची लागण

सुर्यकुमारला संधी का दिली नाही हे मला काही कळलं नाही – गौतम गंभीर

न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आलेल्या मराठी अभिनेत्रीने पुन्हा शेअर केले आपले बोल्ड फोटो!

भाजपचे विद्यमान नगरसेवक संजय भोपी यांचं कोरोनामुळे निधन!

अमित ठाकरेंनी शिक्षक आंदोलकांना दिलेला ‘तो’ शब्द पाळला!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More