बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी केली राजीनाम्याची घोषणा

बंगळुरू | गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा राजीनामा देणार असल्याची माहिती समोर येताच मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर आता बीएस येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे. त्यानंतर कर्नाटकच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता कर्नाटकात भाजपला मोठा धक्का बसला आहे.

मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. जेवल्यानंतर राज्यपालांना भेटून राजीनामा देणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. कर्नाटकात भाजप सरकारला नुकतंच 2 वर्ष पुर्ण झाली आहेत. यासाठी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी बोलताना बीएस येडियुरप्पा यांनी राजीनामा देत असल्याचं सांगितलं आहे.

मी राजीनामा कुठल्याही दुखाःत देत नाही, तर आनंदात राजीनामा देत असल्याचं देखील येडियुरप्पा यांनी सांगितलं आहे. ‘कर्नाटकातील जनतेचा मी ऋणी आहे. मी अधिकारी आणि आमदारांना सांगू इच्छितो, की जनतेने आपल्या सर्वांचा विश्वास गमावला आहे’, असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे. तर, आपण अधिक कठोर आणि स्वच्छ आणि प्रामाणिक मार्गाने कार्य केलं पाहिजे, असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे.

दरम्यान, 23 जुलै 2019 साली नाट्यमय घडामोडीत भाजपने बीएस येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचं सरकार पाडलं होतं. त्यामुळे एचडी कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर संविधानात्मक पेच देखील निर्माण झाला होता. 26 जुलै 2019 साली बीएस येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर आता दोन वर्षातच त्यांनी राजीनामा दिला आहे.

थोडक्यात बातम्या-

दिल्लीतील महाराष्ट्र सदनाला आग; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल

बसच्या छतावर शेकडो लोक, ड्रायव्हरने लावला ब्रेक अन्…, पाहा व्हिडीओ

“ओबीसी आरक्षणाबद्दल केंद्राला किती राग आहे, ते दिसतंय”

“मत मागायला याल, तेव्हा कोकणी माणूस तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही”

परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ; खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More