बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांना मोठा झटका!

औरंगाबाद | भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे बँक खाते सील करण्यात आले आहे. पीएफची रक्कम थकल्यामुळे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या वतीने वैद्यनाथ कारखान्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे.

ईपीएफओच्या औरंगाबाद विभागीय कार्यालयाने पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे बँक खाते जप्त केले. तब्बल 92 लाख रुपयांची थकबाकी वसूल करण्यात आली आहे. सहायक आयुक्त आदित्य तलवारे यांच्या आदेशाने प्रवर्तन अधिकारी सुधीर वानखेडे यांनी ही कारवाई केल्याची माहिती आहे.

पीएफचे एक कोटी 46 लाख रुपये थकल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. सर्व थकबाकीदारांनी थकीत भविष्य निधी देयकांचा त्वरित भरणा करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त जगदीश तांबे यांनी केले आहे.  साखर कारखान्याकडे मार्च 2018 ते ऑगस्ट 2019 या काळातील कर्मचारी आणि कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची एकूण 1.46 कोटींची रक्कम थकीत होती. उर्वरित रकमेच्या वसुलीसाठी कार्यवाही सुरु असल्याचे ईपीएफओ कार्यालयाने सांगितलं आहे.

दरम्यान, पगारच मिळाला नसल्याने वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यातील कामगारांनी मार्च महिन्यात कारखाना बंद केला होता. जोपर्यंत पगार मिळत नाही, तोपर्यंत कारखाना सुरु करणार नसल्याची भूमिका घेत हे कामगार संपावर गेले होते. कर्मचाऱ्यांनी थकीत वेतनासाठी अनेक दिवस आंदोलन केलं होतं.

थोडक्यात बातम्या- 

‘शासन आदेशात एक नाही तर अनेक गोष्टींचा घोळ’; पडळकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

माजी मंत्री ‘संजय राठोड’ यांना पुणे पोलिसांची क्लिन चिट?

मराठमोळ्या संजलने अमेरिकेत खासगी अंतराळ यान बनवणाऱ्या टीममध्ये पटकावलं स्थान!

‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा; घराच्या बाहेर पडत असाल तर सावधान

“शिवसेनेने काँग्रेसशी हातमिळवणी करून आपले देव, धर्म बासणात गुंडाळलेत”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More