बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजपला मोठा धक्का; एका खासदारासह तीन आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत???

कोलकाता | पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजपचे मोठ्या प्रमाणात इतर पक्षातून नेत्यांची आयात केली. निवडणुकीच्या वेळी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमधून अनेक नेत्यांनी पलायन करून भाजपच्या गोटात जागा मिळवली. परंतू खेळ उलटा पडला. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपला आक्रमकपणे तोंड देत अखेर आपली सत्ता कायम ठेवली. भाजपला पश्चिम बंगालमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांनी आता पुन्हा तृणमुल काँग्रेसचा हात पकडला आहे.

भाजपचे बंगालमधील एक खासदार आणि तीन आमदार पक्षाला सोडचिठ्ठी देऊन तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपचे बंगाल प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी बोलावलेल्या बैठकीला पक्षाचे खासदार शांतनू ठाकूर यांच्यासह तीन आमदार अनुपस्थित राहिले होते, त्यानंतर ते पक्ष सोडतील अशी चर्चा चालू झाली आहे.

तृणमूल काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात गेलेले मुकुल राॅय यांची अखेर घरवापसी झाली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत मुकुल राॅय व त्यांचा मुलगा शुभ्रांशू यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुकुल राॅय यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केल्यामुळे भाजपला धक्का बसला आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना पक्षाने राष्ट्रीय उपाध्यक्ष देखील केलं होतं.

मुकुल राॅय यांना भाजपमध्ये धमक्या मिळत हाेत्या. त्यामुळे त्यांची प्रकृतीही खालावली हाेती. ते आता पक्षात महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहेत, असं ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केलं आहे. निवडणुकीच्या ताेंडावर भाजपमध्ये गेलेले गद्दार असून, त्यांना पक्षात परत घेणार नसल्याचं देखील ममता बॅनर्जी यांनी सांगितलं होतं.

थोडक्यात बातम्या-

“भाजपमध्ये गेलेले पुन्हा पक्षात येण्यास इच्छुक, माझ्याकडे काँग्रेसमध्ये येणाऱ्यांची मोठी यादी”

संजय राऊतांच्याच मार्गदर्शनाखाली आमची वाटचाल सुरु- नाना पटोले

‘नागरिकांसोबत मग्रुरी खपवून घेतली जाणार नाही’; नितीन राऊतांचा अधिकाऱ्यांना दम

छोरी धाकड है! खुल्या कुस्ती स्पर्धेत विनेश फोगटची सुवर्णपदकाला गवसणी

“चीनच्या कपटनीतीवर लक्ष ठेवावंच लागेल, गाफील राहून चालणार नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More