बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजपच्या ‘या’ माजी आमदाराला मोठा धक्का! पत्नीच्या शैक्षणिक संस्थेला कोट्यवधींचा दंड

मुंबई | सध्या राज्यात भाजप आणि सत्ताधारी पक्षातील नेत्यांध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी चालू असतानाच भाजपच्या एका माजी आमदाराचं पीतळ उघडं पडलं आहे. भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या पत्नी सुमन मेहता यांच्या शैक्षणिक संस्थेला जिल्हाधिकारी कार्यालयाने कोट्यवधी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

मीरारोड पूर्वेला सुमन मेहता यांची सेव्हन इलेव्हन एज्युकेशन सोसायटी आहे. सोसायटीने 2008 साली नरेंद्र मेहता यांच्या सेव्हन इलेव्हन कन्स्ट्रक्शन कंपनीकडून ही जमीन व शाळा 30 वर्षांच्या भाडेतत्वार घेतली होती. मात्र, याचा नोंदणी आणि मुद्रांक शुल्क भरण्यात आला नव्हता. यामुळे या संस्थेविरुद्ध कारवाई केली जावी, यासाठी अनेक तक्रारी केल्या जात होत्या.

सेव्हन इलेव्हन एज्युकेशन सोसायटीला 97 लाख 40 हजार मुद्रांक शुल्क आणि त्यावर प्रती महिना 2 टक्के असा दंड ठोठाविण्यात आला आहे. अशाप्रकारे मेहता यांच्या शिक्षणसंस्थेला आता कोट्यवधी रुपये भरावे लागणार आहेत. नोटीस बजावल्यानंतर एक महिन्याच्या आत ही रक्कम भरण्याचे आदेश नोटीसमध्ये देण्यात आले आहेत. 23 जुलै रोजी सुमन मेहता यांना ही नोटीस बजावण्यात आली होती.

तसेच आदेशाचं पालन न केल्यास सक्तीची कारवाई केली जाईल, असा इशारा देखील नोटीसमध्ये देण्यात आला आहे. आता सेव्हन इलेव्हन एज्युकेशन सोसायटी जिल्हाधिकाऱ्यांच्या नोटीसचं पालन करणार का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या –

शिवसेनेला मोठा धक्का! तीन वेळा आमदार आणि माजी राज्यमंत्री राहिलेल्या ‘या’ नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

‘एक चांगला कलाकार बनून सेटचा निरोप घेत आहे’, अक्षय कुमारच्या पोस्टनंतर चाहते भावूक

मनसे आमदार राजू पाटील यांची तळीये दरडग्रस्तांना 11 लाखांची मदत

अभिमान बाळगण्यापेक्षा सिंधूची जात शोधण्यात भारतीय व्यस्त; ‘हे’ राज्य आघाडीवर!

दिलासादायक! मुंबईत आज अवघ्या ‘इतक्या’ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More