बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काँग्रेसला मोठा धक्का! माजी मुख्यमंत्र्याने ठोकला काँग्रेसला रामराम

पणजी | जिग्नेश मेवानी आणि कन्हैया कुमार हे दोन युवा नेते लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. मात्र, गेल्या काही दिवसापासून काँग्रेसला गळती लागल्याचं दिसत आहे. अनेक राज्यातून काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. त्यातच आता गोव्यात काँग्रेसला आणखी एक धक्का लागल्याचं पहायला मिळतंय.

2019 मध्ये काँग्रेसचे 10 आमदार फुटले होते. त्यातचं आता गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते लुइझिन फालेरो हे तृणमुल काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे काँग्रेसला गोव्यात मोठा धक्का मानण्यात येत आहे. लुइझिन फालेरो यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा सभापती राजेश पाटणेकर यांच्याकडे सुपुर्द केला आहे.

फालेरो हे आता तृणमुल काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. या प्रवेशाची चांगलीच चर्चा गोव्यात रंगली आहे. लुइझिन फालेरो यांनी माध्यमांना बोलताना सांगितले की, मी 20 दिवस विचार करून हा निर्णय घेतला आहे. तसेच गोव्याच्या विकासासाठी आणि लोकांच्या कल्याणासाठी हा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. गोव्यात भाजपला हरवण्यासाठी ममता बॅनर्जींची रणनिती उपयोगी पडेल, असं लुइझिन फालेरो यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना हरण्यासाठी तृणमुल काँग्रेसच्या फॉर्मुल्याची गरज आहे, असंही लुइझिन फालेरो म्हणाले आहेत.

दरम्यान, 2017च्या गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे सर्वाधिक 17 आमदार निवडून आले होते. परंतु, 10 आमदार भाजपच्या गळाला लागले होते. त्याअगोदरचे दोन आमदार फुटले होते. आता लुइझिन फालेरो तृणमुल काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याने गोव्यात काँग्रेस पक्षात केवळ चारच आमदार शिल्लक राहणार आहेत.

थोडक्यात बातम्या-

“देशात ‘ही’ नवी पद्धत आलीये, काहीजण सुुपारी घेऊन काम करतात”

“अडसूळांना अटक होताच आजारी पडले, आता मुश्रीफांना कोणीच वाचवू शकत नाही”

“सरकार ‘त्या’ गोष्टींवर विचार करायला तयार, शेतकऱ्यांनो आंदोलन मागे घ्या”

‘भारत बंद’ दरम्यान दिल्ली-हरियाणा सीमेवर शेतकऱ्याचा मृत्यू; पोलिसांनी सांगितलं ‘हे’ कारण

“दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्र झुकत नाही, इतिहासाची पुनरावृत्ती करणारा हाच ‘तो’ दिवस”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More