बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कॉंग्रेसला मोठा झटका! प्रणव मुखर्जी यांचे सुपुत्र पक्षाला रामराम ठोकणार?

नवी दिल्ली | सध्या राजकीय वर्तुळात अनेक महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. अनेक पक्षातील नेते अलिकडे पक्षांतर करताना दिसत आहेत. अशातच आता कॉंग्रेसला आणखी एक झटका लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे सुपु्त्र अभिजीत मुखर्जी लवकरच कॉंग्रेसला सोडचिट्ठी देतील, असं बोललं जात होतं.

अभिजीत मुखर्जी कॉंग्रेसला रामराम ठोकत तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र, आता अभिजीत मुखर्जी यांनी स्वत: या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. आपण कॉंग्रेस सोडणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना मुखर्जी यांनी ही माहिती दिली आहे.

पीटीआयशी बोलताना अभिजीत मुखर्जी म्हणाले की, मी कॉंग्रेसमध्येच राहणार आहे. माझा तृणमूल कॉंग्रेस किंवा इतर कोणत्याही पक्षाशी काहीही संबंध नाही. मी पक्षांतर करणार असल्याच्या बातम्यांंमध्ये काहीही तथ्य नाही.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार अभिजीत मुखर्जी यांनी गेल्या आठवड्यात तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्यांची भेट घेतली होती. जंगीपूर विधानसभा जागेवर तृणमूल कॉंग्रेस मुखर्जी यांना उमेदवारी देऊ शकतं, असं देखील बोललं जात आहे. याच मतदारसंघातून प्रणव मुखर्जी दोनवेळा खासदार म्हणून निवडून आले होते. मात्र, नंतर राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी त्यांना खासदारकीची जागा सोडावी लागली होती.

थोडक्यात बातम्या –

नाना पटोलेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या इच्छेवर अजित पवारांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले…

मोठी बातमी! उदयनराजे आणि संभाजीराजेंची होणार पुण्यात भेट ‘या’ विषयावर होणार चर्चा

“कोल्हापूरकरांनो, निर्बंध लादण्याची आम्हाला हौस नाही, थोडं सोसा”

जगातील सर्वात मोठ्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, 38 पत्नी विधवा तर 89 मुलं पोरकी

मराठा आरक्षणावर श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More