बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काँग्रेसला मोठा धक्का; ‘या’ मोठ्या नेत्याची पक्षाला सोडचिठ्ठी

नवी दिल्ली | गेल्या 7 वर्षांपासून काँग्रेसला उतरती कळा लागली आहे. 2014 पासून काँग्रेसने अनेक राज्ये गमावली आहेत. 2019 च्या निवडणुकीआधी पक्षाने पुन्हा भरारी घेतली होती. मात्र लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पुन्हा पराभव झाला. त्यानंतर पक्षातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला होता. त्यानंतर अनेक जवळचे कार्यकर्ते पक्षाला सोडून जाताना दिसत आहेत. त्यातच आता काँग्रेसला आणखी मोठा धक्का बसला आहे.

महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेत्या सुष्मिता देव यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पक्षाचा राजीनामा देत असल्याचं पत्र काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे पाठवलं आहे. सुष्मिता देव या काँग्रेस पक्षातील आघाडीच्या नेत्या होत्या. त्या काँग्रेसकडून खासदार देखील राहिल्या होत्या. त्यांनी मागील काही काळात काँग्रेसच्या संघटनात्मक कार्यात मोठी मदत केली. त्यानंतर आता खुद्द त्यांनीच पक्षाला रामराम ठोकला आहे.

काही काळापुर्वी सुष्मिता देव यांनी त्यांचं ट्विटर अकाऊंटचं प्रोफाईल बदललं होतं. त्यानंतर त्या लवकरच राजीनामा देतील अशी चिन्हे होती. त्यांनी पक्षातील सर्व नेत्यांना ट्विटरवर बॅन केलं होतं. त्यानंतर आता त्यांना आपल्या पदाचा आणि पक्षाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी ट्विट करत याची माहिती दिली आहे.

दरम्यान, नागिरकत्व सुधारणा विधेयकावरून काँग्रेसने सरकारला घेरलं होतं. त्यावेळी सुष्मिता देव यांनी पक्षाविरूद्ध जाऊन वेगळी भूमिका घेतली होती. तेव्हापासून त्या नाराज असल्याचं सांगितलं जात होतं. नुकतंच काँग्रेसच्या नेत्याचं ट्विटर अकाऊंट लाॅक करण्यात आलं होतं. त्यावेळी सुष्मिता देव यांचंही अकाऊंट लाॅक करण्यात आलं होतं.

थोडक्यात बातम्या-

चक्क खासदारच विसरले राष्ट्रगीत; व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

देश सोडण्यासाठी अफगाणी नागरिकांची धडपड, विमानतळाचे फोटो पाहून हैराण व्हाल

15 ॲागस्टची सुट्टी ठरली दुर्देवी, मुलाच्या डोळ्यादेखत आईनं सोडला जीव

‘…म्हणून मला देश सोडावा लागला’; अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतींनी सांगितलं कारण

आज राज्यातील ‘या’ भागात पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More