बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का, ‘या’ बड्या खेळाडूनं वर्तवलं अशुभ भाकीत!

मुंबई | आयपीएलचा 14वा हंगाम येत्या 9 एप्रिलपासून सुरू होत आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 9 एप्रिलला या हंगामातला पहिला सामना चेन्नईच्या चेपाॅक मैदानावर खेळवला जाणार आहे. आयपीएलच्या सर्व हंगामामध्ये चांगली खेळी करणाऱ्या चैन्नई सुपर किंग्स संघाची मागील वर्षी कामगिरी खराब राहिली होती. यावरूनच आता भारतीय संघाच्या माजी खेळाडूने चैन्नई सुपर किंग्स संघाबद्दल मोठे संकेत दिले आहेत.

माझ्या अंदाजाप्रमाणे चेन्नईचा संघ यावर्षी पाॅईन्टस टेबलमध्ये मधल्या स्थानावर राहिल. मला यात काही आश्चर्य वाटणार नाही की, चेन्नईचा संघ यावर्षी प्लेऑफमध्ये पोहोचणार नाही. ऑक्शनमध्ये या संघाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. पण त्यांना त्यातही अपयश आलं. चेन्नईचे पहिले पाच सामने मुंबईत होणार आहे तर, त्यांचे पुढील चार सामने दिल्लीत होणार आहेत. या दोन्ही ठिकाणी सामने असल्यानं त्यांचे पहिले नऊ सामने फसू शकतात. या खेळपट्टीवर आक्रमक खेळीची गरज असते आणि फास्ट गोलंदाजी करावी लागते. या दोन्ही गोष्टीचा चेन्नईच्या संघात अभाव आहे, असं मत माजी खेळाडू आकाश चोपडा याने व्यक्त केलं आहे.

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईच्या संघाने मागील वर्षी सुमार कामगिरी केली होती. पहिल्यांदा संघ प्लेऑफमध्ये जागा मिळवू शकला नव्हता. संघ मागील वर्षी सातव्या स्थानावर राहिला होता. चेन्नईच्या चाहत्यांना यावर्षी संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. तर दुसरीकडे या हंगामात चेन्नईचे अनेक परदेशी खेळाडू खेळणार नसल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान, सध्याच्या चालू हंगामात मुंबई इंडियन्सला हरवणं ही मोठी गोष्ट असेल. मुंबईच्या खेळाडूंचा सध्याचा फाॅम पाहता मुंबईला हरवणं एवढी सोपी गोष्ट असणार नाही, असं भारताचे माजी खेळाडू सुनील गावस्कर यांनी म्हटलं होतं. आयपीएलचा गतविजेता संघ मुंबई इंडियन्स आणि राॅयल्स चॅलेंजर्स बंगलुरू यांच्यामध्ये पहिला सामना रंगणार आहे.

थोडक्यात बातम्या-

14 वर्षांचं प्रेम मात्र फक्त एक नकार आणि झाला रक्तरंजीत शेवट!

राज्यमंत्री अब्दुल सत्तारांचे धक्क्यावर धक्के, ‘या’ नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

उत्तर प्रदेश पोलिसांची अब्रू धुळीला, पोलिसासमोर चोरांनी गाडी नेली चोरुन!

नणंदेच्या नवऱ्याच्या प्रेमात आकंठ बुडाली, त्यानंतर तीनं जे पाऊल उचललं ते अत्यंत धक्कादायक!

पुण्यातील कोरोनाबाधितांची आजचीही आकडेवारी धक्कादायक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More