बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बाबो! लॉर्ड्सवर झालेल्या पराभवानंतर इंग्लंडच्या ‘या’ बड्या खेळाडूने सोडला संघ

मुंबई | सध्या भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. पाच सामन्याच्या मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली. पहिला सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. परंतु, दुसऱ्या सामन्यात भारताने इंग्लंडचा 151 धावांनी पराभव केला. त्यामुळे यजमान संघाची स्थिती अत्यंत वाईट झाली आहे. त्यातच आता इंग्लंड संघाला आणखी मोठा धक्का बसलाय. इंग्लंडच्या एका मोठ्या खेळाडूने संघ सोडला आहे.

इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून शंभर चेंडूंची ‘द हंड्रेड’ नावाची एक स्पर्धा खेेळवण्यात येते. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अली हा बर्मिंघम फिनिक्स या संघाचा कर्णधार होता. भारत-इंग्लंड यांच्यात कसोटी सामना सुरू होण्याआधी मोईन अली बर्मिंघम फिनिक्स संघासाठी मोलाची कामगिरी बजावत होता. परंतु, इंग्लंड संघाने त्याला कसोटी सामना खेळवण्यासाठी बोलवलं. त्यामुळे संघाची जबाबदारी लियाम लिव्हिंग्स्ट याच्यावर सोपवण्यात आली.

द हंड्रेड स्पर्धेत बर्मिंघम फिनिक्स संघ आता फायनलला पोहचला आहे. तर दुसरीकडे भारत आणि इंग्लंड यांच्यातील पुढील सामना 25 ऑगस्टला खेळवला जाणार आहे. त्यामुळे मोईन अली द हंड्रेड स्पर्धेची फायनल खेळण्यासाठी जाणार आहे. ‘मी संघात सामिल होण्यासाठी उत्सुक आहे. आशा आहे की, आमचा संघ फायनलमध्ये जिंकेल’, असं मोईल अली म्हणाला आहे.

दरम्यान, तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी काल इंग्लंडचा संघ जाहीर झाला आहे. यात मोईन अलीला संघात जागा देण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मालिकेत बायो बबलचं पालन केलं जातंय. त्यामुळे आता मोईन अली भारताविरूद्धचा तिसरा कसोटी सामना खेळणार की नाही?, असा सवाल आता उपस्थित केला जातोय.

थोडक्यात बातम्या-

राज्यातील शाळा सुरु करण्याबाबत राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

‘भूज’ चित्रपटाच्या चित्रीकरणानंतर अभिषेक दुधैयांची मुलाखत, पाहा व्हिडीओ

“शिवसेनेच्या 32 वर्षांच्या पापाचा घडा फोडल्याशिवाय राहणार नाही”

अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर तालिबान्यांचा पार्कमधील मुर्खपणा, पाहा व्हिडीओ

पुण्यातील चर्चेत आलेलं मोदी मंदिर अखेर हटवलं, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More