Top News विदेश

गुगल आणि अॅमेझॉनला मोठा झटका; भरावा लागणार 16 कोटी डॉलर्सचा दंड

नवी दिल्ली | गुगल आणि अॅमेझॉनला मोठा झटका लागला आहे. या दोघांनाही 16 कोटी डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला आहे.

फ्रान्समधील डेटा प्रायव्हसीवर लक्ष ठेवणाऱ्या एका संस्थेकडून हा दंड ठोठावण्यात आलाय. यानुसार अॅमेझॉन आणि गुगला 16.3 कोटी डॉलर्सचा दंड भरावा लागणार आहे.

डेटा प्रायव्हसीच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुगलवर 100 दशलक्ष युरो म्हणजेच 12 कोटी डॉलर्स तर अॅमेझॉनला ३५ दशलक्ष युरो म्हणजे 4 कोटींचा दंड लावला आहे.

CNIL च्या म्हणण्याप्रमाणे, गुगल आणि अॅमेझॉन कंपन्यांच्या फेन्च वेबसाईटने इंटरनेट युझर्सना ट्रॅकर किंवा कुकीजच्या बाबतीत मंजुरी मागितली नव्हती. या दोन्ही कंपन्यांनी काही काळापूर्वी वेबसाईट्स मध्ये बदल केले होते. परंतु हे बदल फ्रान्सच्या नियमांप्रमाणे योग्य नव्हते.

थोडक्यात बातम्या-

मुंबईत डिसेंबरच्या थंडीमध्ये पावसाची हजेरी

गांधी कुटुंंबाने आता काँग्रेस सोडावी- रामचंद्र गुहा

देशातील अॅलोपथी डॉक्टरांचं आज कामबंद आंदोलन

…तर मुंबईत रात्री 11 ते पहाटे 6 पर्यंत कर्फ्यू-पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल

’31 डिसेंबरपर्यंत तो फलक हटवला नाहीतर…’; तृप्ती देसाईंचा साई संस्थानला इशारा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या