बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारताला जबरदस्त धक्का! भारताची सलामीवीर जोडी स्वस्तात माघारी परतली

मुंबई | भारत पाकिस्तानविरूद्ध आज टी-20 आंतरराष्ट्रीय विश्वचषक स्पर्धेला सुरूवात झाली आहे.  पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम भारताला फलंदाजी करण्याचं निमंत्रण दिलं आहे. शाहिन आफ्रिदीच्या पहिल्याच षटकामध्ये भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा बाद झाला आहे.

शाहिन आफ्रिदीने पहिल्या षटकामधील सुरूवातीचे दोन चेंडू राहुलकडून निर्धाव केलेत. तिसऱ्या चेंडूवर एक धाव घेत राहुलने रोहितकडे खेळण्यासाठी डाव दिला असता 4 थ्या चेंडूवर आफ्रिदीने रोहितला बाद करत भारताला जबरदस्त धक्का दिला.

त्यानंतर तिसऱ्या षटकात भारताचा धडाकेबाज सलामीवीर फलंदाज के.एल,राहुल देखील शाहिन आफ्रिदीने बाद केल्यानंतर भारताची सलामीवीर जोडी स्वतात माघारी परतली आहे. शेवटचं वृत्त हाती लागलं तेव्हा विराट कोहली 5 तर सुर्यकुमार यादव 7 धावांवर खेळत होता.

पाकिस्तान विरुद्ध भारताची मिस्ट्रीवरून चक्रवर्तीला भारतीय संघात स्थान मिळेल की नाही, अशी चर्चा होती. वरून चक्रवर्ती आणि शार्दुल ठाकूर यांच्यात कोणाला संधी मिळेल, असा सवाल उपस्थित केला जात होता. मात्र अखेर शार्दूलला राखीव ठेवत वरूनला संधी मिळाली.

थोडक्यात बातम्या-

पाकिस्तान विरुद्ध भारताची ‘मिस्ट्री रणनिती’; या खेळाडूला दिलं संघात स्थान

शाकिब बनला टी-20 वर्ल्ड कपचा नवा बादशहा! ‘या’ जागतिक विक्रमाची केली नोंद

“भुजबळांनी नांदगावच्या जागेचा नाद करू नये, महाविकास आघाडीचं सरकार नसतं तर ते मंत्री असते का?”

“मुख्यमंत्री 15 मिनिटं बाहेर येतात अन् लगेच घरात जातात, आमची पण लग्न झाली आहेत पण…”

‘जम्मू-काश्मीरमध्ये 3 कुटूंबांची दादागिरी यापुढे बंद’; अमित शहा यांचा जम्मू-काश्मीरच्या नेत्यांना इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More