बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारताला मोठा धक्का, सानिया-अंकिताची जोडी पहिल्याच फेरीत बाहेर

टोकियो | टोकियो ऑलिंपिंकच्या तिसऱ्या दिवशी भारताच्या पदरी निराशा पडली आहे. टेनिस स्टार सानिया मिर्झा ही अंकिता रैनासोबत मिळून महिला डबल्सच्या पहिल्याच फेरीत पराभूत झाली आहे. सानिया आणि अंकिताच्या पराभवानंतर टोकिओ ऑलंपिकच्या टेनिस स्पर्धेमध्ये सुमित नागलच्या रुपात एकमेव आशा उरली आहे.

सानिया मिर्झाचं ही चौथी ऑलिम्पिक स्पर्धा होती. बीजिंग, लंडन आणि रियो या तीन ऑलिम्पिकचा अनुभव असलेल्या सानियाकडून यंदा मोठी अपेक्षा होती. मात्र सानिया मिर्झा आणि अंकिता रैना या जोडीचा पहिल्याच फेरीत पराभव झाला. त्यांनी पहिला सेट 6-0 असा एकतर्फी जिंकला होता. त्यानंतर त्यांचा खेळ घसरला. नंतरचे दोन्ही सेट त्यांनी गमावले. पहिला सेट जिंकूनही सानिया-अंकिता जोडीचा 6-0 6-7(0) 8-10 असा तीन सेटमध्ये पराभव झाल्यानं त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.

दुसऱ्या सेटमध्ये कचनोक बहिणींनी स्पर्धेत बरोबरी केली. त्यानंतरच्या टायब्रेकरमध्ये सानिया-अंकिता एकही पॉइंट जिंकू शकल्या नाही. आणि युक्रेनी जोडीने सलग 7 पॉइंट जिंकून सेट आपल्या नावावर केला.

दरम्यान, स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा आणि अंकिता रैनाला महिला मिश्र गटात पराभव पत्करावा लागला. यासोबतच भारताच्या महिला मिश्र गटात पदक जिंकण्याच्या आशांना पूर्णविराम लागला आहे. 

थोडक्यात बातम्या –

कोकण हे फक्त वीकेंड ट्रीप एन्जॉय करण्यापुरतं नाही तर…- भरत जाधव

भूस्खलनामुळे 15 फूट रस्ता खचला; कोल्हापुरातील धक्कादायक व्हिडीओ समोर

डोक्यावरचं छप्पर उडालेल्या कोकणी बांधवांसाठी राज ठाकरेंकडून 1 हजार सोलापुरी चादरी!

आता करण जोहर करणार ‘बिग बाॅस 15’ चं सूत्रसंचालन!

पुरामुळे कोल्हापुरातील ‘हे’ महत्वाचे रस्ते बंद

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More