बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ईडीचा अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला मोठा झटका!

मुंबई| बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandes) आणि सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekhar) संबंधित मनी लाँन्ड्रींग प्रकरणात आता ईडीने मोठी कारवाई केली आहे. ईडीने सप्लीमेंट्री चार्जशीट दाखल केली आहे.

ईडीने सुकेश चंद्रशेखर विरोधात 200 कोटींच्या मनी लाँन्ड्रींंग प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात जॅकलिन फर्नांडिसलाही आरोपी ठरवण्यात आले आहे. पण कोर्टाने अजून तरी या आरोपपत्राची दखल घेतलेली नाही. त्यामुळे जॅकलिनला सध्या अटक करता येणार नाही. असं असलं तरी जॅकलिनला मात्र आता देशाबाहेर जाण्यास परवानगी नाही. कारण या प्रकरणामध्ये जॅकलिन आणि सुकेश चंद्रशेखर यांचे संबंध असल्याचे पुढे आले होते. सुकेशकडून अभिनेत्रीला दागिने, गाड्या यांसारख्या महागड्या वस्तू गिफ्ट मिळाल्याची माहिती समोर आली होती.

या प्रकरणामुळे जॅकलिन अनेक महिने चर्चेत होती. संबंधित प्रकरणामध्ये तिच्यावर अनेक आरोपही लावण्यात आले होते. शिवाय अनेकवेळा तिची चौकशीही करण्यात आली होती.

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! शिंदे सरकारचा महाविकास आघाडीला दणका

CNG गाड्या वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आली समोर!

शेअर बाजाराला पुन्हा अच्छे दिन; गुंतवणूकदार बक्कळ मालामाल

आदित्य ठाकरेंनी उडवली एकनाथ शिंदेंची खिल्ली, म्हणाले…

’50 खोके एकदम ओके’; विरोधकांची विधिमंडळ परिसरात घोषणाबाजी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More