बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोदी सरकारला मोठा धक्का! मुख्य आर्थिक सल्लागार के सुब्रमण्यम यांचा राजीनामा

नवी दिल्ली | देशातील वातावरण सध्या विविध मुद्द्यांवरून तापलेलं आहे. अनेक क्षेत्रातील निर्णयावरून मोदी सरकार अडचणीत आलं आहे. यातच आता मोदी सरकारच्या मुख्य आर्थिक सल्लागार के सुब्रमण्यम यांनी राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यानंतर देशातील राजकारणात चांगलीच चर्चा रंगली आहे. मोदी सरकारच्या आर्थिक नितीचा विरोधक फज्जा उडवत आहेत.

मी माझ्या जबाबदारीची जाण ठेवून प्रत्येक दिवशी काम केलं आहे. नाॅर्थ ब्लाॅक येथील ऑफिसमध्ये असताना मी प्रत्येक काम अगदी जबाबदारीनं सांभाळल्याचं वक्तव्य सुब्रमण्यम यांनी केलं आहे. के सुब्रमण्यम हे गेली 3 वर्ष झालं देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार राहीले आहेत. मोदी सरकारच्या प्रभावी अधिकाऱ्यांमध्ये सुब्रमण्यम यांचा समावेश केला जातो.

भारत सरकारच्या आर्थिक नितीला योग्यपणे न्याय देण्याचं काम सुब्रमण्यम यांनी केलं आहे. त्यांच्या राजीनाम्यानं विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. गेल्या काही वर्षात राजीनामा अनेक महत्वाच्या अधिकाऱ्यांनी सरकारमधील उच्चपदांचा राजीनामा दिला आहे. परिणामी मोदी सरकारच्या नितीवर अधिकारी वर्ग नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

दरम्यान, के सुब्रमण्यम यांनी राजीनामा देत असताना त्यांच्या ट्विटर खात्यावरून एक पत्र पण प्रसिद्ध केलं आहे. आपण आपल्या पद्धतीने काम केल्याची भावना यात व्यक्त केली आहे. काम करताना सहकार्य केल्याबद्दल पंतप्रधानांसमवेत सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत.

पाहा ट्विट –

थोडक्यात बातम्या 

‘या’ कारणामुळे तालिबान्यांची तंतरली, तब्बल 100 हून अधिकजण मृत्यूमुखी!

ठरलं तर! ‘या’ तारखेपासून सुरू होणार पुण्यातील महाविद्यालये

भारताच्या ‘या’ युवा वेगवान गोलंदाजाने क्रिकेटमधून घेतली निवृत्ती!

“जर चंद्रकांत पाटलांनी बिनशर्त माफी मागितली नाही तर…”

“मी साखर कारखानदार नाही, तुमचं मत असेल तर मी आग्रह धरेन”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More