मोदींना मोठा धक्का?; हे राज्य भाजपच्या हातातून जाणार?

शिमला | हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) विधानसभेच्या 68 जागांसाठी 12 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान झाले. येथे मुख्य लढत काँग्रेस (Congress) आणि सत्ताधारी भाजप(BJP)मध्ये आहे. आम आदमी पक्षानेही याठिकाणी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात यश आले नाही.

सकाळी 9.00 वाजेपर्यंत मिळालेल्या कलानुसार हिमाचल प्रदेशमधील एकूण 68 विधानसभा जागांपैकी 50 हून अधिक जागांचे कल समोर येऊ लागले आहेत. आतापर्यंत काँग्रेस 35 जागांवर तर भारतीय जनता पक्ष 31 जागांवर आघाडीवर आहे.

हिमाचल प्रदेशात काँग्रेस पक्षाची सत्ता आल्यास प्रतिभा सिंह मुख्यमंत्रीपदाच्या दावेदार ठरू शकतात. प्रतिभा सिंह या मंडीच्या खासदार आहेत आणि राज्यात पक्षाच्या प्रमुख आहेत.

भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा जयराम ठाकूर यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा करून निवडणुकीत उतरवलं आहे.

काँग्रेस नेते वीरभद्र सिंह यांच्या निधनानंतर काँग्रेस पहिल्यांदा ही निवडणूक लढवत आहे. दरम्यान हिमाचल प्रदेशच्या मतदानानंतर सर्वच एक्झिट पोलमध्ये हिमाचल प्रदेशात पुन्हा भाजपची सत्ता येणार असल्याचं सांगितलं जात होतं.

प्रत्यक्षात काँग्रेस आणि भाजपमध्ये टफ फाईट होताना दिसत आहे. काँग्रेसच्या या अनपेक्षित यशामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-