बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, पहिल्या मॅचमध्ये खेळणार नाही ‘हा’ स्टार खेळाडू

चेन्नई | आयपीएलच्या यंदाच्या मोसमाला 9 एप्रिलपासून सुरूवात होणार आहे. यावर्षीचा पहिला सामना गतविजेती मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यात होणार आहे. या मोसमातही मुंबईची टीम तगडी असून पुन्हा एकदा ट्रॉफी जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे. रोहितच्या नेतृत्वात मुंबईने सर्वाधिक 5 वेळा आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. मागच्या मोसमात फायनलमध्ये मुंबईने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला होता.

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात मुंबईने 7 खेळाडूंना विकत घेतलं, पण त्यांची संभाव्य प्लेईंग-11 निश्चित मानली जात आहे. क्विंटन डिकॉक पहिल्या मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दिसणार नाहीये. हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. पाकिस्तानविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये डिकॉक मैदानात उतरला होता, त्यामुळे त्याला 7 दिवस क्वारंटाईन व्हावं लागणार आहे. डिकॉकऐवजी मुंबई क्रिस लीनला ओपनिंगला खेळवू शकते. बिग बॅश लीगमध्ये लीनने उत्कृष्ट कामगिरी केली होती.

सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या यांनी इंग्लंडविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी केली होती, त्यामुळे त्यांचीही निवड निश्चित आहे. तसंच मुंबईचा सगळ्यात महत्त्वाचा खेळाडू असलेला कायरन पोलार्डही खेळेल. बॉलिंगची जबाबदारी जसप्रीत बुमराह आणि ट्रेन्ट बोल्ट सांभाळतील. कुल्टर नाईलला मागच्या मोसमानंतर मुंबईने रिलीज केलं, पण लिलावात पुन्हा 5 कोटी रुपयांना विकत घेतलं.

दरम्यान, यावर्षी मुंबईने सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर यालाही लिलावात विकत घेतलं. याआधी तो मुंबईसोबत नेट बॉलर म्हणून होता. पण यंदा त्याला खेळण्याची संधी मिळणार का नाही? असा सवाल चाहते उपस्थित करत आहेत. जर मुंबईची टीम प्ले-ऑफमध्ये लवकर पोहोचली तर शेवटच्या काही लीग मॅचमध्ये अर्जुनला खेळवलं जाऊ शकतं.

थोडक्यात बातम्या – 

पुणेकरांनो काळजी घ्या!; कोरोना रुग्णवाढीची आजची आकडेवारी देखील अत्यंत धक्कादायक

मुंबई इंडियन्समध्ये स्टार खेळाडूंचा भरणा, मात्र तरीही ‘ही’ एक गोष्ट पडू शकते महागात!

क्रिकेटप्रेमींसाठी खूशखबर; भारतातील ‘या’ मैदानावर होऊ शकतो T20 World Cupचा पहिला सामना

आयपीएल सुरु होण्याआधीच विराट कोहलीला मोठा धक्का, ‘ही’ भविष्यवाणी खरी ठरली तर…

काल जुळ्या मुलांना दिला जन्म, आज कोरोनामुळे आईचा मृत्यू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More