बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबई इंडियन्सला मोठा धक्का; संघाचा धाकड खेळाडू आयपीएलला मुकणार?

मुंबई | 2021 च्या उर्वरित आयपीएलमधील सामने खेळवण्यात येणार की नाही?, याबाबत सर्वांच्या मनात साशंकता होती. मात्र बीसीसाआयने उर्वरित सामने संयुक्त अरब अमिरात म्हणजेच यूएईमध्ये खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी ही माहिती दिली. त्यानंतर खेळाडूंमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. परंतू मुंंबईचा संघ सध्या चिंतेत दिसत आहे.

मुंबई इंडियन्सच्या फलंदाजीचा आधारस्तंभ आणि काॅरेबियन खेळाडू कायरन पोलार्ड उर्वरित आयपीएल खेळणार नसल्याची चर्चा चालू झाली आहे. कॅरेबियन प्रिमीअर लीग स्पर्धा आणि आयपीएल एकाच वेळेस येणार असल्याचं सांंगण्यात येत आहे. आयपीएलचं वेळापत्रक सध्या जाहीर झालेलं नाही. मात्र आयपीएलच्या या उर्वरित सामन्यांना 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

याच कालावधीत वेस्टइंडिजमध्ये सीपीएल म्हणजेच कॅरेबियन प्रिमीअर लीग स्पर्धेचं आयोजन हे  28 ऑगस्ट ते 19 सप्टेंबर दरम्यान करण्यात आलं आहे. या स्पर्धेमुळे पोलार्डला मुंबईकडून काही सामन्यांना मुकावं लागेल किंवा उर्वरित सामने तो खेळू शकणार नाही असं वृत्त समोर येत आहे. जर आयपीएलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलं तर सर्व वेस्ट इंडिज खेळाडू आयपीएल खेळू शकणार नाहीत.

दरम्यान, कायरन पोलार्ड हा आयपीएलमधील सर्वात अनुभवी खेळाडू आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यात 6 चेंडूत 6 षटकार खेचण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. तर या आयपीएल हंगामात चेन्नई विरूद्धच्या सामन्यात त्यानं एकहाती सामना फिरवला आणि मुंबई इंडियन्सला मोठा विजय मिळवून दिला होता.

थोडक्यात बातम्या-

‘संबित पात्रा म्हणजे गटारीतला कीडा’; लाईव्ह कार्यक्रमात काँग्रेस प्रवक्त्या भडकल्या

“अर्थमंत्रालयात कमी IQ वाले लोक, मोदींना तर अर्थव्यवस्थाच समजत नाही”

नितीन गडकरी म्हणजे चुकीच्या पक्षातील चांगला आणि कार्यक्षम माणूस- अशोक चव्हाण

“चंद्रकांत पाटलांनी छत्रपतींना उपकाराची आठवण करुन दिली”

“एक रुपया इंधन दरवाढ झाली की आंदोलने करणारे भाजपचे नेते, कार्यकर्ते आता कुठे लपलेत?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More