बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एलन मस्क यांच्या मंगळ मोहिमेला मोठा धक्का; लँडिंगवेळी घडला धक्कादायक प्रकार

नवी दिल्ली | मंगळ ग्रहावर मानवी वस्ती वसवण्याची एलन मस्क यांची महत्वकांक्षा आहे. यासाठी त्यांचे प्रयत्न देखील चालू आहेत. यादरम्यान मस्क आणि त्यांच्या कंपनीने स्टारशिप एस.एन 10चं लँचिंग घोषीत केलं होतं. हे उड्डाण टेक्सासच्या स्पेसएक्सच्या बोका चिकामधून करण्यात आलं होतं.

स्पेसएक्स स्टारशिप एस.एन 10ने उड्डाण घेतलं, मात्र ते फार करामत दाखवू शकलं नाही. लाँचपॅडवरुन लाँच झाल्यापासून 10 मिनिटानंतर राॅकेटचा स्फोट झाला. याआधी एस.एन 8 आणि एस.एन 9 देखील असेच आगीत भस्म झाले होते.

स्पेसएक्स स्टारशिप एस.एन 10च्या लँडिंगनंतर झालेल्या स्फोटाचे कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र काहींच्या मते, राॅकेट मधून मिथेन गॅसच्या गळतीमुळे हा अपघात झाला आहे.

दरम्यान, एस. एनमध्ये चार इंजिन लावण्यात आले होते. तसेच उड्डाणच्या दरम्यान यातील 2 इंजिन वेगळे झाले होते. या राॅकेटचे लँडिंग विंग्स बेसशी जोडले नव्हते आणि त्यामुळे हा अपघात झाल्याचं कारण देखील समोर आलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘सर्व पेट्रोल पंपांवरील मोदींचा फोटो असणारे होर्डिंग हटवा’; निवडणूक आयोगाचा आदेश

“उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे राहुल गांधी झाले आहेत”

…अन् लेकीचं शीर कापून तो थेट पोलीस ठाण्याकडे निघाला; घडलेला प्रकार पाहून पोलिसही हादरले

“मोदी सत्तेत आल्यापासून भारतातील स्वातंत्र्य कमी झालं”; ‘ग्लोबल फ्रिडम’चा अहवाल

‘कल हो ना हो’ मधील जियाला ओळखणं झालंय कठीण, पाहा आता कशी दिसते

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More