बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का!

बारामती | अनेक वर्षांपासून बारामती (Baramati) मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची (Ncp) आहे. मात्र आता हा मतदार संघ कोणत्याही परिस्थितीत ताब्यात घ्यायचा, असा चंग भाजपने (Bjp) बांधल्याचं दिसतंय. बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देणारी बातमी समोर आली आहे.

माजी राज्यमंत्री विजयबाप्पू शिवतारे (Vijay Shivtare) यांच्या नेतृत्वात बारामती लोकसभा इंदापूर तालुका, करमाळा सोलापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) शिवसेना गटातील असंख्य पदाधिकारी यांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय.

यावेळी माजी मंत्री विजयबापू शिवतारे, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते किरण पावसकर, समन्वयक आशिष कुलकर्णी आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, भाजपने बारामती लोकसभा मतदार संघावर लक्ष केंद्रीत करण्याचा मोठा निर्णय घेतला असून त्याप्रमाणे प्रचारसभाही सुरु झाल्या आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अर्थमंत्री निर्मला सीतारमण यादेखील बारामतीत येऊन गेल्या आहेत.

बारामती लोकसभा मतदारसंघ काबीज करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा करेक्ट कार्यक्रम करणार, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More