बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिवसेने पाठोपाठ शिंदे गटाचा आता राष्ट्रवादीलाही मोठा झटका

सोलापूर | शिवसेेना (Shivsena) पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीलाही (NCP) सोलापुरमधून मोठा झटका बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तब्बल 18 पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे. 18 पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राजीनामा देत आज (ता. 20) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (CM Eknath shinde) गटात प्रवेश केला आहे. याबाबत त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेऊन याची घाेषणा केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या रोजगार आणि स्वयंरोजगार सेलच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटामध्ये प्रवेश केला आहे. सोलापुरातील एकनाथ शिंदे गटाचे नेते मनीष काळजे (Manish Kalaje) यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय विश्रामगृह येथे पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला.

पत्रकार परिषदेत नव्याने शिंदे गटात दाखल झालेले सागर शितोळे (Sagar Shitole) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आपल्यासह अठरा पदाधिकाऱ्यांनी रामराम ठाेकल्याचे जाहीर केले. तसेच मनीष काळजे यांनी सागर शितोळेंसह सर्वांना निश्चित पाठबळ दिलं जाईल असे आश्वासित केले.

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More