बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नितीन राऊतांना मोठा झटका! काॅंग्रेसनं ‘या’ पदावरुन हटवलं

नवी दिल्ली | काही दिवसांपूर्वीच काॅंग्रेस पक्षाने (Congress) नागपूर विधान परिषदेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, नितीन राऊत आणि पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांना समन्स बजावले होते. अशातच आता काँग्रेसचे नेते आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत ( Nitin Raut) यांना मोठा दणका मिळाला आहे.

नितीन राऊत यांची काँग्रेस एससी विभागाच्या अध्यक्षपदावरून काढण्यात आलं आहे. त्यामुळे आता सगळीकडे एकच चर्चा होत आहे. आता नितीन राऊत यांच्या जागी राजेश लिलोठिया यांना संधी देण्यात आली आहे.

मागील काही दिवसांपासून नितीन राऊत आणि नाना पटोले यांच्यामध्ये वाावाद होत आहे. आता हे काॅंग्रसचे अंतर्गत वाद चव्हाट्यावर यायला लागले आहेत. राऊत यांना हे पद सोडावे लागणार आहे. या संदर्भात काँग्रेसने ट्वीट करत माहिती दिली आहे.

दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदाचे दिल्लीवरून नाव आलेले नाही. त्यामुळे त्याचीच चर्चा सुरु असल्याचं चित्र आहे. उद्या सकाळपर्यंत  नाव जाहीर होण्याची शक्यता आहे. अशी माहिती नाना पटोले यांनी दिली आहे.

थोडक्यात बातम्या – 

‘लसीचे डोस घ्या, नाहीतर कारवाई करु’; महापालिकेचा गंभीर इशारा

“दहा मिनीटं रडायचं आणि जाताना पप्प्या घ्यायच्या, हे नेहमीचंच झालंय “

“…पण अजित पवारांनी विलिनीकरण डोक्यातून काढून टाका, असं धुडकावल्यासारखं सांगू नये”

“मला टार्गेट केलं जात आहे, त्यामुळे मला आत्महत्या करावीशी वाटतेय”

‘एसटी विलिनीकरण डोक्यातून काढून टाका’ अजित पवारांचा कर्मचाऱ्यांना इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More