बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पंजाब किंग्जला मोठा धक्का! ‘युनिव्हर्सल बाॅस’ आयपीएलमधून बाहेर

मुंबई | आयपीएलच्या उर्वरित सामन्यांचा थरार यूएईत सुरू झाला आहे. त्यातच आता क्रिकेटचा युनिव्हर्सल बाॅस अशी ओळख असलेला वेस्ट इंडिज आणि पंजाब किंग्जचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल आयपीएलमधून बाहेर पडला आहे. त्याच्या या अचानक बाहेर पडल्यानं सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. पंजाब किंग्जने याची अधिकृतरित्या याची घोषणा केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून मी वेस्ट इंडिज क्रिकेट, कॅरिबियन प्रिमियम लीग आणि आता आयपीएलचा हिस्सा आहे. त्यामुळे या सगळ्यात मी बायो बबलचा भाग आहे. मला स्वत:ला मानसिकदृष्टया फ्रेश ठेवण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं ख्रिस गेलने सांगितलं आहे.

आगामी दुबईमध्ये होणाऱ्या विश्वचषकात मला वेस्ट इंडिज संघाला मदत करायची माझी इच्छा आहे. त्यामुळे मी आता आराम करण्याचा निर्णय घेतला असल्याचं ख्रिस गेलने सांगितलं आहे. मला आराम करण्याची परवानगी दिल्याबद्दल पंजाब टीमचे आभार, असं म्हणत ख्रिस गेलने पंजाबच्या व्यवस्थाकांचे आभार मानले आहेत.

दरम्यान, ख्रिस गेल आता संघाचा हिस्सा नसल्याने पंजाब संघाला त्याची मोठी कमतरता जाणवेल. तर दुसरीकडे त्याची जागा कोणता खेळाडू घेईल याची आता क्रिडाविश्वात चांगलीच चर्चा रंगली आहे.

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना सीबीआयकडून समन्स

“डोकंच नसेल तर शरीराचा काय फायदा? सेनापतीच नाही तर लढायचं कसं?”

रेल्वे स्टेशनवर सापडला होता नारायण, MPSCतून बनला अधिकारी; बच्चू कडूंचंही योगदान!

पुण्यातील उद्यानाच्या नावावरुन नवा वाद, ‘साध्वी’ शब्द हटवण्याची मागणी

मुंबईच्या कोरोना आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात घट, वाचा आजची आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More