बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज कुंद्राला मोठा झटका; अश्लील व्हिडीओ प्रकरणी पुन्हा अडचणीत

मुंबई | गेल्या महिन्यात राज कुंद्रा (Raj Kundra) प्रकरण चांगलंच तापलेलं पहायला मिळालं. अश्लील व्हिडीओ बनवणे आणि अपलोड करणे याप्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती आणि उद्योजक राज कुंद्राला अटक करण्यात आली होती. यानंतर याप्रकरणी अनेक खुलासे होत अनेक गोष्टी समोर आल्या.

आता राज कुंद्राला अश्लील व्हिडीओ प्रकरणी मुंबई उच्च कोर्टाकडून (Mubai High Court) मोठा झटका मिळाला आहे. अश्लील व्हिडीओ बनवणे आणि अपलोड करणे याप्रकरणी राज कुंद्राचा अटकपूर्व जामीन याचिका फेटाळला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज कुंद्राच्या अडचणींमध्ये वाढ झाल्याचं पहायला मिळत आहे.

मागच्या वेळी याचिका दाखल करताना राज कुंद्रानं म्हटलं होतं की, त्यांच्या प्रोडक्शन कंपनीनं बनवलेले व्हिडीओ कामूक होते मात्र अडल्ड कन्टेंटवाले नव्हते. मात्र राजनं दाखल केलेली याचिका मुंबई उच्च कोर्टानं अमान्य करत अटकपूर्व जामीन याचिका फेटाळला आहे.

दरम्यान, राज कुंद्राच्या अटकेनंतर त्याच्या आणि शिल्पा शेट्टीच्या कुटुंबियांच्या अडचणींत वाढ झाली. राजच्या अटकेनंतर मीडियाचाही खूप प्रभाव त्यांच्या वैयक्तिक जीवनावर पडलेला पाहायला मिळाला.

थोडक्यात बातम्या – 

अभिनेत्री मानसी नाईकचा चुलीवर स्वयंपाक करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ

“घरकोंबड्या ठाकरे सरकारच्या सल्ल्यानुसार कोमट पाणी पिऊन…”

“ते एक बंद षडयंत्रच होतं”, मोहन भागवत यांचं मोठं वक्तव्य

धक्कादायक! ‘या’ ठिकाणी सापडला कोरोनाचा नवा व्हेरिएंट

“उद्धव ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदावर राहणार असल्याची चर्चा म्हणजे…”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More