बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

समीर वानखेडेंना मोठा धक्का! ‘या’ प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने याचिका फेटाळली

मुंबई | राज्यात मागील काही दिवसांपासून कथित ड्रग्स प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. सध्या एनबीचीचे तपास अधिकारी समीर वानखेडे आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची खैरात होताना दिसत आहे. ड्रग्स प्रकरणातील साक्षीदार के.पी.गोसावीचा सुरक्षारक्षक प्रभाकर साईलने समीर वानखेडेंवर गंभीर आरोप केले आहेत.

प्रभाकर साईलच्या आरोप ग्राह्य धरू नयेत यासाठी मुंबई सत्र न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. त्यावर समीर वानखेडेंना मोठा पहिला धक्का मिळाला आहे. मुंबई सत्र न्यायालयानं समीर वानखेडेंची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळं समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

समीर वानखेडेंनी सत्र न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं. त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं, की माझी वैयक्तिक बदनामी केली जात आहे. त्यांनी प्रतिज्ञापत्रामध्ये प्रामुख्याने तीन मागण्या केल्या होत्या. या सर्व आरोपांचा आपल्या तपासावर परिणाम होत आहे, असं समीर वानखेडेंनी म्हटलं होतं.

दरम्यान, या सर्व परिणामामुळं या प्रकरणाची तात्काळ सुनावणी करण्यात यावी, असं त्यांनी म्हटलं होतं. पण सोमवारी त्यांची मुंबई सत्र न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. आपणास जे काही सांगायचं आहे, ते उच्च न्यायालयात सांगा. हे प्रकरण हे सत्र न्यायालयात संपलं आहे, असं मुंबई सत्र न्यायालयाने सुनावणी दरम्यान म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या –

अन् भर कार्यक्रमात पुरूषाने चक्क गव्हर्नरच्या कानशिलात लगावली; पाहा व्हिडीओ

“…तर शेतकऱ्यांना 4000 कोटी मिळाले असते”

‘तुम्ही प्रवाहाच्या विरूद्ध पोहता तेव्हा…’; साईलच्या आरोपानंतर क्रांती रेडकरचं प्रत्युत्तर

ड्रग्स प्रकरणावर राज्यपाल कोश्यारीचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

फाडफाड इंग्रजी शिकायचीय?, मग Google करेल तुमची मदत!

‘माझे वडील हिंदू तर आई मुस्लीम, पण मी…’; मलिकांच्या आरोपावर वानखेडेंचं प्रत्युत्तर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More