बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिवसेनेला मोठा धक्का; ‘हा’ बडा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर

दापोली | शिवसेनेला (Shivsena) लवकरच एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण आता शिवसेनेकडून 25 वर्षे आमदार राहिलेलेे सुर्यकांत दळवी लवकरच राष्ट्रवादीत (Rashtrvadi) प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. पक्षावर नाराज असल्याने सुर्यकातं दळवी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.

सुर्यकांत दळवी यांच्यासोबत दापोली पंचायत समितीचे माजी सभापती किशोर देसाई, शांताराम पवार, नगराध्यक्ष परवीन शेख, प्रदेश युवासेना पदाधिकारी ऋषिकेश गुजर हेदेखील गुरुवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. या सर्वांनी शिवसेनेला रामराम ठोकत राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शिवसेनेचं मात्र मोठं नुकसान होणार आहे.

सुर्यकांत दळवी यांनी पक्ष सोडताना, 2014 च्या निवडणुकीत झालेल्या दगाबाजीमुळे माझा पराभव झाला असल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर पक्षाकडून सतत मला डावलण्यात आलं. यावर मी नाराज असून माझी यामुळे घुसमट होत असल्याचंही सांगितलं आहे. सुर्यकांत दळवी यांनी माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना उद्देशून हा टोला लगावला होता.

दरम्यान, सुर्यकांत दळवी यांनी शिवसेनेकडून 5 वेळा विधानसभा निवडणूक जिंकली आहे. परंतू सुर्यकांत दळवी यांच्या 2014 च्या पराभावानंतर रामदास कदम यांनी दापोलीतील शिवसेनेची सुत्रे हातात घेतली आणि दळवींना पक्षाच्या निर्णयप्रक्रियेतून बाजूला केलं. तेव्हापासून सुर्यकातं यांच्या पक्षबदलाची चर्चा झाली होती. मात्र अखरे त्यांनी शिवसेनेला राजीनाम देत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे.

थोडक्यात बातम्या-

मुंबईसाठी एकहाती सामने जिंकणाऱ्या पांड्या बंधूंचा पत्ता कट; वाचा रिटेन खेळाडूंची यादी

केंद्राच्या विरोधाला न जुमानता उद्धव ठाकरेंनी घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

‘किती लोकांना भरपाई देण्यात आली त्याची माहिती दिली नाही’; सर्वोच्च न्यायालयाने ९ राज्यांना झापलं

लगीन घाई बरी नाही! नवरा-नवरीच्या फजितीचा व्हिडीओ तूफान व्हायरल, पाहा व्हिडीओ

ओमिक्रॉन विषाणूने जगाचं टेन्शन वाढवलं, रूग्णसंख्येबाबत धक्कादायक माहिती समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More