विदर्भात ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी; ठाकरे गटाला आणखी एक धक्का

Uddhav Thackeray controversy

Uddhav Thackeray | महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे सातत्याने बदलत असून, शिवसेना (Shiv Sena UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर विधानसभेत महायुतीने जोरदार पुनरागमन केले आणि आता शिवसेना ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांची गळती सुरूच आहे.

विदर्भात शिवसेनेचं ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी

शिवसेनेचे पूर्व विदर्भ संघटक किरण पांडव (Kiran Pandav) यांनी ठाकरे गटासह काँग्रेस आणि मनसेलाही मोठा धक्का दिला आहे. आज नागपूरमध्ये एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे.

ठाकरे गटातील हे मोठे नेते शिंदे गटात सामील होणार

स्नेहल अनिल देवतरे – सेलूच्या नगराध्यक्ष
दिपक बेले – ठाकरे गटाचे चंद्रपूर शहर प्रमुख
अनिल देवतरे – वर्ध्याचे उपजिल्हाप्रमुख
मनसेलाही धक्का, प्रदेश उपाध्यक्ष शिवसेनेत
याशिवाय मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर सरासकर (Kishor Sarasakar) आणि नागपूर ग्रामीण जिल्हा प्रमुख दिलीप गायकवाड (Dilip Gaikwad) हे देखील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

ठाकरे गटासाठी मोठा धक्का

या पक्षप्रवेशामुळे विदर्भात शिवसेना शिंदे गट अधिक मजबूत होणार असून ठाकरे गटाची अवस्था आणखी कमजोर होण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही गळती उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठं आव्हान ठरणार आहे.

शिंदे गटातील नेत्यांनी सांगितले की, शिवसेनेत (Shinde Group) मोठ्या प्रमाणावर प्रवेश होत असल्याने पक्षाच्या ताकदीत वाढ होत आहे. यामुळे आगामी निवडणुकांसाठी महायुतीला मोठा फायदा होणार आहे. यावर उद्धव ठाकरे आणि ठाकरे गट काय प्रतिक्रिया देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Uddhav Thackeray)

Title :  Big Blow to Uddhav Thackeray in Vidarbha

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .