बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आमदारांनंतर आता शिवसेनेच्या खासदारांनीही उद्धव ठाकरेंचं टेंशन वाढवलं; महत्त्वाची माहिती समोर

मुंबई | शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनंतर आता खासदारांमुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं (Uddhav Thackeray) टेंशन वाढलं आहे. शिवसेनेचे 14 खासदार हे शिंदे गटाच्या बैठकीला हजर आहे. एकूण18 खासदारांपैकी 14 खासदार हे शिंदे गटाच्या बैठकीला हजर असल्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे खासदार हे शिंदे गटात सामील होणार अशी चर्चा रंगली होती. आज या चर्चेवर शिक्कामोर्तब झालं आहे. यामुळे उद्धव ठाकरेंची डोकेदुखी वाढली आहे.

धैर्यशील माने आणि संजय मंडलिक शिंदे गटात सामील होणार आहे. लवकरच अधिकृत भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे.  दोन दिवसांपूर्वी कोल्हापुरातील मेळाव्याला दोघांनाही दांडी मारली होती.

दरम्यान, दुसरीकडे आता, गेल्या अनेक दिवसांपासून नाराज असलेले शिवसेनेचे नेते आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. कदम यांनी पत्र लिहून शिवसेनेबद्दल आपली नाराजीही बोलून दाखवली आहे.

थोडक्यात बातम्या-  

SBI च्या ग्राहकांसाठी गुड न्यूज; बँकेने घेतला महत्त्वाचा निर्णय

एसटी बस अपघातात मृत्यू झालेल्या नातेवाईकांना मुख्यमंत्र्यांकडून आर्थिक मदत जाहीर!

“लग्न झाल्यानंतर तुम्ही काहीच नाही केलं तर पोरं कशी होणार”

शिवसेनेला मोठा झटका; उद्धव ठाकरेंवर आरोप करत ‘या’ बड्या नेत्याचा राजीनामा

इंदौरवरून अमळनेरला येणारी बस नर्मदा नदीत कोसळली, 13 जणांचा मृत्यू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More