कुस्तीपटू विनेश फोगट निलंबित! ऑलिम्पिकमध्ये नियमांचं उल्लंघन केल्यानं WFI ची धडक कारवाई
नवी दिल्ली | टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी मिळवलेल्या घवघवीत यशामुळे सध्या देशभरात आनंदाचं वातावरण आहे. मात्र, ही टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटला चांगलीच महागात पडली आहे. ऑलिम्पिकमध्ये नियमांचं उल्लंघन केल्यानं रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियानं विनेशवर तात्पुरती बंदी आणली आहे.
ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये विनेशनं तीन नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंसह राहण्यास नकार देणे, भारतीय टीमच्या कोचकडून प्रशिक्षण घेण्यास नकार देणे, ऑलिम्पिक असोसिएशनकडून मंजूर करण्यात आलेले सिंगलेट परिधान न करणे, असे आरोप विनेशवर करण्यात आले आहेत.
याप्रकरणी तिची बाजू मांडण्यासाठी विनेशला एका आठवड्याचा कालावधी देण्यात आला आहे. विनेश तिची बाजू मांडत नाही तोपर्यंत तिला कोणतीही राष्ट्रीय किंवा देशांतर्गत स्पर्धा खेळता येणार नाही. यावर अंतिम निर्णय हा रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचाच असेल.
दरम्यान, विनेश फोगटचे असे वर्तन पहिल्यांदाच नव्हते. यापूर्वी देखील तिने असे वर्तन केले आहे. परंतु खेळाडूची प्रतिष्ठा लक्षात घेता त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते, अशी माहिती WFI चे प्रेसिडंट ब्रीज भूषण सिंह यांनी दिली आहे.
थोडक्यात बातम्या –
मुंबईकरांची पाससाठी रेल्वे स्थानकावर गर्दी, वाचा पाससाठी कोणती कागदपत्रं गरजेची?
राज्य सरकारचा मोठा निर्णय; राजीव गांधी यांच्या नावाने दिला जाणार पुरस्कार
शाळा उघडताच कोरोनाचा शिरकाव; 20 विद्यार्थीं कोरोना पाॅझिटिव्ह सापडल्यानं खळबळ
“लसीचे दोन्ही डोस घेतलेले मुख्यमंत्री मंत्रालयात जाणार की अजूनही घरुनच काम करणार?”
“भाजपला मराठा आरक्षणाचं श्रेय हवं असेल तर…”
Comments are closed.