अभिजीत बिचुकले राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी अर्ज भरणार, म्हणाले…
मुंबई। महाराष्ट्रात सध्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर दुसरीकडे सगळे नेतेमंडळी विधानपरिषद निवडणुकीत व्यस्त असताना बिग बॉस(Big Boss) फेम अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukle) यांचं लक्ष सध्या एका वेगळ्या निवडणुकीकडे आहे.
अभिजीत बिचुकले नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेचा विषय ठरतात.मात्र, या वेळेसचं कारण जरा वेगळं असून बिचुकले राष्ट्रपतीपदाची निवडणुक लढवणार आहेत. बिचुकले राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज देखील दाखल करण्याच्या तयारीत आहेत.
अभिजीत बिचुकले ठरवून दिलेल्या 50 खासदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठीचा प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे जर राष्ट्रवादीचे (NCP) अध्येक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी मदत केली तर मला नक्कीच खासदार आमदारांचा पाठींबा मिळेल, असा कॉन्फिडन्स बिचुकलेंनी बोलून दाखवला आहे.
दरम्यान, एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना, मी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी इच्छूक असल्याचं बिचुकले म्हणाले. राष्ट्रपतींनी देशासाठी बरंच काही करायचं असतं पण ते करत नाहीत. म्हणूनच आता मी देशातल्या आमदार, खासदारांशी बोलतोय, असंही बिचुकले म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
अभिनेत्री काजल अग्रवालच्या बाळाचं नाव आहे अगदी खास, पोस्ट शेअर करत म्हणाली…
‘हा तर अपमान आहे’, संजय राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
“मित्रांपासून दूर राहा, आपल्याला विधान परिषद निवडणूक कुठल्याही परिस्थितीत जिंकायचीये”
राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान खात्याचा अंदाज
‘काम हवं असेल तर या लोकांबरोबर चार दिवस रहावं लागेल’; अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
Comments are closed.