“बिग बॉसमुळे माझे आयुष्य खराब झाले, माझे करिअर संपविण्याचीही धमकी मिळाली”
मुंबई | गेल्या काही दिवसांपासून कलाकार बिग बॉस या लोकप्रिय कार्यक्रमावरती आरोप करत आहेत. बिग बॉस 14 मध्ये गाजलेले अभिजित बिचूकलले यांनी अभिनेता सलमान खानवर गंभीर आरोप केले आहेत. त्यातच आता अभिनेत्री नैना सिंहने बिग बॉसवर काही गंभीर आरोप केले आहेत. बिग बॉसमुळे माझे आयुष्य खराब झाले, असं नैना सिंहनं म्हटलं आहे.
अभिनेत्री नैना सिंहने वाईल्ड कार्डद्वारे बिग बॉसच्या घरात एंट्री केली होती. पंरतु, अवघ्या दोन आठवड्यांमध्येच एलिमिनेशन झाले. त्यानंतर ती बाहेर पडली. आता नैना सिंहने बिग बॉस आणि कुमकुम भाग्यच्या निर्मात्यांवर आरोप केले आहेत. बिग बॉस 14 केल्यानंतर माझे आयुष्य खराब झाले आहे. कुमकुम भाग्य मालिका सोडल्याचा मला कोणताही पश्चात्ताप नाही, असंही नैना सिंहने म्हटलं आहे.
सध्या कोरोना सुरू असल्यामुळे मी बिग बॉसची ऑफर स्वीकारली. परंतु, माझी वाईल्ड कार्ड द्वारे एंट्री होईल याची मला कुठलीही कल्पना नव्हती. मला 3 आठवडे हॉटेलमध्ये क्वारंटनाईन करण्यात आले होते. तिथे माझा खूप वेळ वाया गेला, असं नैना सिंहने म्हटलं आहे. बिग बॉसच्या घरापेक्षा जास्त दिवस मी क्वारंटाईनमध्ये घालवले, असंही तिनं म्हटलं आहे.
दरम्यान, बिग बॉसची ऑफर जर मला पुन्हा मिळाली तर मी स्वीकारणार नाही. कारण त्यांना काय हवे आहे हे मला माहिती आहे, असं नैना सिंहने म्हटलं आहे. मी काम मिळवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र, माझे काम कुठेही होत नाही. ज्यावेळेस कुमकुम भाग्य मालिका सोडली तेव्हा मला करिअर संपवण्याची धमकी देण्यात आली होती, असंही नैनानं म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
‘लघु, सुक्ष्म दिलासा’! मिलिंद नार्वेकरांचा नितेश राणेंना खोचक टोला
IPL 2022 ! किंग कोहली पुन्हा कर्णधार होणार?; आरसीबीने स्पष्टच सांगितलं…
“मुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे, तुमच्यात हिंमत असेल तर…”
अब्दुल सत्तारांनी पुन्हा छेडला ‘सेना-भाजप युती’चा राग, म्हणाले..
‘म्युझिकल थेरेपी’! व्यायाम करुन घेण्यासाठी नर्सनं लढवली अनोखी शक्कल, पाहा व्हिडीओ
Comments are closed.