बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बिग बॉसच्या घरात कोरोनाची वाईल्ड कार्ड एन्ट्री; ‘या’ सदस्याला कोरोनाची लागण

मुंबई | बिग बॉसच्या प्रत्येक सीझनवर चाहत्यांनी भरभरून प्रेम केलं आहे. तर या लोकप्रिय बिग बॉसच्या 15व्या सीझनला काही आठवड्यांपूर्वी सुरूवात झाली. पण टीआरपीच्या रेसमध्ये बिग बॉस 15 अजूनही मागे आहे. प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी बिग बॉस 15च्या मेकर्सकडून वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून मेकर्सने बिग बॉसच्या घरात 3 वाईल्ड कार्ड सदस्य आणण्याचा निर्णय घेतला होता. पण, वाईल्ड कार्ड सोबत बिग बॉसच्या घरात कोरोनानेही एन्ट्री झाली आहे.

अभिनेत्री देेवोलिना भट्टाचार्यसह रश्मी देसाई आणि बिग बॉस मराठी सीझन 2 चे लोकप्रिय सदस्य अभिजीत बिचुकले हे तिघे वाईल्ड कार्ड म्हणून बिग बॉस 15च्या (Big Boss 15) घरात एन्ट्री घेणार होते. अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukle) यांची घरात एन्ट्री होणार म्हणून चाहतेही खूष होते पण बिचुकले वाईल्ड कार्ड म्हणून बिग बॉसच्या घरात येण्यापूर्वीच त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचं समोर येत आहे.

बिग बॉसच्या या सीझनकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याने शोची टीआरपीही घसरली. वाईल्ड कार्ड्यच्या एन्ट्रीने (Big Boss Wild Card Entry) हे चित्र बदलेल अशी अपेक्षा मेकर्सना होती पण बिचुकले यांना कोरोना झाल्याची माहिती समोर आल्याने सगळ्यावर पाणी पडलं आहे. बिचुकलेंना कोरोना झाल्याने त्याचं बिग बॉसच्या घरात जायचं स्वप्न तुर्तास तरी लांबणीवर गेलं आहे.

बिग बॉस 15च्या घरात बिचुकलेची जागा आता राखी सावंत (Rakhi Sawant) घेणार आहे. रश्मी देसाई आणि देवोलिना भट्टाचार्य सोबत आता राखी सावंत वाईल्ड कार्ड सदस्य म्हणून प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी येणार आहे. राखी सावंत सध्या क्वारंटाईनमध्ये असल्याने रश्मी आणि देवोलिनाची एन्ट्रीही पुढे ढकलण्यात आली आहे. वाईल्ड कार्डच्या एन्ट्रीमुळे शोच्या टीआरपीत काही फरक पडेल का? हे बघण्यासारखं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

हिवाळ्यात वाढतोय ‘या’ आजाराचा धोका; घ्या ‘ही’ खास काळजी

“शरद पवार तो काळ गेला”; ॲड. गुणरत्न सदावर्तेंचा पवारांना इशारा

एकेकाळी होती राहुल गांधींसोबत लग्नाची अफवा, आता केला भाजपमध्ये प्रवेश

“सरकारचा निर्णय मान्य आहे का?, सदाभाऊ आणि पडळकरांची फसवणूक झाली”

‘रात्रीस खेळ चाले’तून शेवंताची एक्झिट, जाता जाता सांगितले सिनेसृष्टीतले काळे कारनामे

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More