बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चार दिवसांनंतर सोन्याच्या दरात मोठे बदल, वाचा ताजे दर

पुणे | सोनं हा भारतीयांसाठी जीव की प्राण समजला जातो. सोन्याचे दागिने घालून मिरवणं एवढंच नव्हे तर एक उत्तम गुंतवणूक म्हणून सोनं खरेदी करण्याकडे भारतीयांचा मोठा कौल असतो. त्यामुळे जगभरातील मार्केटपैकी भारत हे सोन्यासाठी सर्वात मोठं मार्केट मानलं जातं. भारतात सोन्याचा बाजार नेहमीच गरम असतो.

गेले चार दिवस पुण्यातील सराफा बाजारात सोन्याचा दर स्थिर होता. मात्र, आज पुणे शहरात सोन्याच्या दरात 150 रुपयांची घट अनुभवायला मिळाली आहे. आज पुण्यामध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 49 हजार 300 रुपये प्रती तोळ्यावर बंद झाला आहे.

सोन्याबरोबरंच चांदीच्या दरात देखील आज घट पाहायला मिळाली आहे. आज पुण्यातील सराफा बाजारात प्रती किलो चांदीमागे 400 रुपयांची घट झाली आहे. 400 रुपयांच्या घटीसह आज चांदीचा दर 67 हजार 100 रुपये प्रती किलोवर बंद झाला आहे.

दरम्यान, सोन्याच्या भावावर आंतरराष्ट्रीय दराचा जरी फरक पडत असला तरी काही स्थानिक गोष्टीही सोन्याच्या दरावर प्रभाव टाकत असल्याचं दिसून येतं. बहुतांशवेळा इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडूनच सोन्याचा दर ठरवला जातो. त्यामध्ये स्थानिक आयात कर आणि MCX या कमोडिटी मार्केटचा विचार केला जातो. MCX हे देशातील सर्वात मोठे कमोडिटी मार्केट असून या ठिकाणी सोन्याचा भाव ठरवला जातो.

थोडक्यात बातम्या –

“उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय नेता व्हावं पण राष्ट्रवादीपेक्षा नाही, असं राऊतांना वाटतं”

श्रीलंका दौऱ्यावरील भारतीय संघात कोरोनाचा शिरकाव; ‘या’ खेळाडूला झाली कोरोनाची लागण, आजचा टी-20 सामना रद्द

…अन् तिने आपल्या मुलांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं, तळीयेतील माऊलीची शौर्यगाथा

‘ज्यांचा संबंध नाही त्यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा टाळा’; शरद पवारांच्या आवाहनावर फडणवीस म्हणाले,’मी तर विरोधी पक्षनेता’

‘बाई पॅन्ट कुठे आहे?’; अभिनेत्री राधिका आपटे झाली ट्रोल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More