बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दोन दिवसांनंतर सोन्याच्या दरात मोठे बदल, वाचा ताजे दर

पुणे | सोनं हा भारतीयांसाठी जीव की प्राण समजला जातो. सोन्याचे दागिने घालून मिरवणं एवढंच नव्हे तर एक उत्तम गुंतवणूक म्हणून सोनं खरेदी करण्याकडे भारतीयांचा मोठा कल असतो. त्यामुळे जगभरातील मार्केटपैकी भारत हे सोन्यासाठी सर्वात मोठं मार्केट मानलं जातं. भारतात सोन्याचा बाजार नेहमीच गरम असतो.

गेले तीन दिवस सोन्याचे दर स्थीर होते. मात्र, आज सोन्याच्या दरात मोठी घट झाली आहे. आज सोन्याच्या दरात 370 रुपयांची घट झाली आहे. 370 रुपयांच्या घटीसह पुण्यामध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 49 हजार 500 रुपये प्रती तोळ्यावर बंद झाला आहे.

सोन्याबरोबरच चांदीच्या दरात देखील आज घट पाहायला मिळाली आहे. आज पुण्यातील सराफा बाजारात प्रती किलो चांदीमागे 50 रुपयांची घट झाली आहे. 50 रुपयांच्या घटीसह आज पुण्यात चांदीचा दर 67 हजार 850 रुपये प्रती किलो आहे.

दरम्यान, सोन्याच्या भावावर आंतरराष्ट्रीय दराचा जरी फरक पडत असला तरी काही स्थानिक गोष्टीही सोन्याच्या दरावर प्रभाव टाकत असल्याचं दिसून येतं. बहुतांशवेळा इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडूनच सोन्याचा दर ठरवला जातो. त्यामध्ये स्थानिक आयात कर आणि MCX या कमोडिटी मार्केटचा विचार केला जातो. MCX हे देशातील सर्वात मोठे कमोडिटी मार्केट असून या ठिकाणी सोन्याचा भाव ठरवला जातो.

थोडक्यात बातम्या –

ह्रदयद्रावक! पुण्याच्या वेदिका शिंदेचा अखेरचा तो व्हिडीओ व्हायरल

अखेर मुहूर्त ठरला! उद्या दुपारी 4 वाजता बारावीचा निकाल होणार जाहीर

सावधान राहा! ‘हे’ पाच पदार्थ पुन्हा गरम करुन खाऊ नका, कारण…

‘ऑडिशनमध्ये निवड व्हावी म्हणून मी फोन सेक्स केला पण…’; अभिनेत्रीचा गौप्यस्फोट

ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रात असा असेल पाऊस?, वाचा हवामान खात्याचा अंदाज!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More