Top News देश

ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्याच्या नियमात 14 डिसेंबरपासून मोठा बदल

नवी दिल्ली | सध्या ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्याचा जास्तीत जास्त लोक उपयोग करत आहेत. मात्र अशातच आरबीआयने एक मोठा निर्णय घेतला आहे. येत्या 14 डिसेंबरपासून मोठा बदल करण्यात आला आहे.

रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंटही (RTGS) सुविधा डिसेंबर महिन्यात लागू करण्याची घोषणा आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केली आहे. 14 डिसेंबरपासून ही सुविधा लागू होणार आहे. डीजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

आरटीजीएस प्रणाली वर्षाचे सर्व दिवस 24 तास उपलब्ध केली जाणार आहे. याची सुरुवात 14 डिसेंबर 2020 च्या 00:30 वाजल्यापासून होणार आहे. याआधी या प्रणालीत सर्व कामकाजाच्या दिवशी सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत उपलब्ध आहे. फक्त  महिन्याचा दुसरा आणि चौथा शनिवारी हे उपलब्ध नाही.

दरम्यान, आरटीजीएस हे मोठ्या ट्रान्झॅक्शनसाठी याचा वापर केला जातो. यामध्ये दोन लाख रुपयांपेक्षा कमी पैसे पाठवत येत नाही. आपण नलाइन किंवा बँकेच्या शाखेत जाऊन दोन्ही पद्धतीने वापरू शकतो. मात्र ब्रांचमध्ये RTGS मधून फंड ट्रान्सफर केल्यानंतर शुल्क द्यावं लागतं.

महत्वाच्या बातम्या-

शहाणपणाची भूमिका घ्या; शरद पवारांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना सल्ला

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाबाबत धनंजय मुंडे यांची मोठी घोषणा, म्हणाले…

रंगभूमीची सेवा करणारा सच्चा कलाकार आज गेला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ईडीकडून प्रताप सरनाईकांना तिसऱ्यांदा समन्स; 10 डिसेंबरला हजर राहण्याची सूचना

जेष्ठ अभिनेते रवी पटवर्धन काळाच्या पडद्याआड

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या