बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सिद्धार्थ शुक्लाच्या सोशल मीडिया अकांऊटमध्ये मोठा बदल, चाहतेही भावूक

मुंबई | ‘बिग बॉस 13’ चा विजेता सिध्दार्थ शुक्लाचं निधन वयाच्या 40 व्या वर्षी हृद्यविकाराच्या झटक्यानं झालं. सिद्धार्थच्या अचानक झालेल्या निधनामुळे सर्वांना धक्का बसला होता. त्याच्या अकाली जाण्यानं बाॅलिवूडचंही मोठं नुकसान झालं आहे.

सिध्दार्थ शुक्लाच्या इंन्स्टाग्रामवर 24 ऑगस्टला शेवटची पोस्ट शेअर केली होती. सिध्दार्थ शुक्लाच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या जुन्या पोस्ट शेअर करून त्याला आपल्यामध्ये जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अभिनेता सिध्दार्थ शुक्लाच्या इंन्स्टाग्राम अकाऊंटमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. सिध्दार्थच्या इन्स्टा अकाऊंटला आता इंन्स्टाग्रामवर (Remembering) आठवणीच्या रूपात दाखवलं जात आहे. चाहत्याच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा चाहते भावूक झालेले पहायला मिळालं.

सिध्दार्थ शुक्लाच्या इंन्स्टाग्राम अकाऊंटचे स्क्रीनशॉट काढून चाहते सोशल मीडिया प्लॅटफॉमवर शेअर करत आहेत. सिध्दार्थ शुक्लाची आठवण काढत लिहिलं आहे, की अशी अकाऊंट्स एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरच्या आयुष्याची आठवण ठेवण्याचं ठिकाण बनतात. अभिनेता सिध्दार्थ शुक्लाचे चाहते आजही त्याची प्रचंड आठवण काढत असतात.

दरम्यान, सोशल मीडियावर चाहत्यांनी त्याची आठवण काढून कमेंट करायला सुरूवात केली आहे. सिध्दार्थ आपल्यामध्ये शारिरिकरित्या उपस्थित नसला तरी तो नेहमीच आपल्या मनावर राज्य करेल. चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर स्क्रीनसाॅट शेअर केल्यावर आता (Remembering) हटवण्यात आल्याचं समजतंय.

 

थोडक्यात बातम्या – 

“तुम्ही पाच वर्षात काही केलं नाही आणि आम्हाला 15 दिवसात करायला सांगता”

कोरोनाची चौथी लाट येणार?; ICMR च्या वक्तव्याने सर्वांचं टेंशन वाढलं

‘ओबीसी आरक्षण मिळू नये म्हणून भुजबळांवर कोणाचा दबाव आहे का?’; फडणवीसांचा हल्लाबोल

मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणी वाढल्या

“प्रत्येक राज्यात राज्यपाल असतो, महाराष्ट्रात ‘भाजपाल’ आहे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More