बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आरोग्य विभागाच्या परीक्षेत पुन्हा मोठा गोंधळ, परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका पोहोचल्याच नाही

नाशिक | सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत गट क आणि गट ड प्रवर्गातील जागांसाठी होत असलेली परीक्षेमध्ये पुन्हा गोंधळ निर्माण झाला आहे. याआधी ही परीक्षा प्रवेश पत्र आणि इतर कारणांमुळे चर्चेत आली होती. त्यानंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही परीक्षा पुढे ढकलण्यात येत असल्याची माहिती दिली होती. मात्र त्यानंतर ही या परीक्षेत नियोजनाचा अभाव दिसून आल्याने तरूणांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागला आहे.

नाशिक जिल्ह्यातील गिरणारे केंद्रावर प्रश्नपत्रिका अर्धातास उशिरा पोहोचली. त्यानंतर संतप्त उमेदवारांनी या संबंधित अधिकाऱ्यांकडे माहिती विचारली असता. त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच प्रश्न पत्रिका घेऊन येणाऱ्या अधिकाऱ्यांकडे ओळखपत्रच नसल्याने उमेदवारही हैराण झाले. त्यानंतर त्या ठिकाणी गोंधळाची परीस्थिती निर्माण झाली. काही वेळानंतर जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी आल्यानंतर परीक्षा पुढे पार पडली असली तरी या परिक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहे.

आरोग्य विभागाची या आधी परिक्षा 25 सप्टेंबर रोजी होणार होती. परंतु न्यासा कम्युनिकेशनने परीक्षा घेण्यास असमर्थता दाखवल्यानंतर परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. या परीक्षेसाठी अगोदर परीक्षा प्रवेश पत्रावर काही उमेदवारांचे परीक्षा केंद्र चीनमध्ये प्रदेश या ठिकाणांचा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे ही परीक्षा सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

दरम्यान, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी या परीक्षाबाबत विद्यार्थ्यांना आश्वासन दिलं होतं की, ही परीक्षा पुढे व्यवस्थित पार पडेल. मात्र नाशिक जिल्ह्यातील या प्रकारामुळे आरोग्य भरती प्रक्रियावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

थोडक्यात बातम्या- 

‘या’ रेल्वे स्थानकावर 55 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह, प्रशासनाची झोप उडाली

…तर स्वातंत्र्यवीर सावरकरांना ‘भारतरत्न’ने सन्मानित करा- संजय राऊत

भाजपचा आणखी एक नेता म्हणतो, ‘माझ्यामागे ईडी लागणार नाही, कारण मी भाजपचा खासदार’

“भविष्यात राजेश टोपेंची जागा आर्थर रोड तुरुंगात असेल”

“शाहरुख खानने भाजपत प्रवेश केला तर कोकेन नाही, पीठ सापडलं म्हणून सांगतील”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More